Posts

Showing posts from September, 2025

SET परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. भरत कोळी यांचा धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे सत्कार

Image
आर.सी. पटेल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड पॉलिटेक्निक, शिरपूर येथील क्रीडासंचालक प्रा. भरत कोळी यांनी शारीरिक शिक्षण विषयातील SET परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर टाकली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. प्रा. भरत कोळी हे उत्कृष्ट शारीरिक शिक्षण विषयाचे लेखक, बालभारती शारीरिक शिक्षण पाठ्यपुस्तक मंडळ पुणे सदस्य, राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू, बॉक्सिंग प्रशिक्षक, तसेच राज्य बॉक्सिंग पंच म्हणून कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील दुहेरी प्रगतीमुळे प्रा. कोळी हे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. या सत्कार प्रसंगी धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे खजिनदार जितेंद्र बोरसे, एम.आर. पटेल सीबीएसई स्कूलचे क्रीडा समन्वयक व बॉक्सिंग प्रशिक्षक धीरज पाटील, स्वतंत्र फायनान्सचे मॅनेजर व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे तांत्रिक अधिकारी ऋषिकेश अहिरे, कबड्डी प्रशिक्षक हेमंत शिरसाठ, के.व्ही.टी.आर. सीबीए...