हंटर कमिशन 1882 (भारतीय शिक्षण सुधारणा आयोग) यांनीही "क्रीडा क्षेत्राचा विकासास भर दिला.

🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊


*भरत कोळी*
*खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहील*


*लेख-29*


*#हंटर कमिशन 1882*
*(भारतीय शिक्षण सुधारणा आयोग) यांनीही "क्रीडा क्षेत्राचा विकासास भर दिला#.....*


            1600 यावर्षी इंग्रज साम्राज्य भारतात स्थिर होण्यास सुरुवात...आणि प्रत्यक्ष 23 जून 1757 पासून सुरवात "1802 वसईच्या तहाने" भारतात वेगळया   साम्राज्याची अंमल सुरू झाला. पण मी या लेखात फक्त क्रीडा विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. 
   
 इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. पण त्यांनी राज्य करत असतांना भारताला आधुनिक काळात आणले हे सत्य परिस्थिती आहे. कारण इंग्रजी माध्यमातून भारतीय समाजात एकता निर्माण होऊन "राष्ट्रीय चळवळ" उभी राहिली आणि भारताला1947 ला स्वातंत्र्य मिळवून दिले.पण इंग्रजांनी "आधुनिक" हा  शब्द  खुप चांगल्या पद्धतीने वापरला,त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या त्यात काही त्यांनी अप्रत्यक्षपणे "क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केला.
गव्हर्नर जनरल लार्ड रिपनने एन विल्यम डब्ल्यू सर हंटर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली, व हंटर कमिशन नियुक्त करण्यात आले. सर विल्यम हंटर हे एक इंग्रज अधिकारी मसुदी हुशार आणि उदारमतवादी होते त्यांचे शिक्षणाविषयी त्याचे मत उदार होतेच पण त्याने स्वतः निर्णय व जबाबदारी नघेता भारतीय व्यक्तींना भारतीय शिक्षण सुधारणा विषयी मते त्यांनी घेतली,त्यात अनेक भारतीय व्यक्तींनी आपले मते नोंदवली त्यात प्रामुख्याने महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई, रमाबाई पंडित अश्या अनेक नामवंत व्यक्तींनी मते दिली.या कमिशनने सर्व प्रातांना भेट देत सुमारे 200 अधिनियम 1882 ला अहवाल सादर केला त्यात त्यांनी अनेक शिफारशी केल्या होत्या..
📌प्राथमिक शिक्षणास प्रोत्साहन
📌खाजगी पुढाकारास प्रोत्साहन
📌नैतिक शिक्षण
📌शारीरिक शिक्षण
📌महिला शिक्षण व
📌मुस्लिम शिक्षण

प्रामुख्याने यावर त्यांनी भर दिला होता आधुनिक शिक्षण पद्धतीने भारतीय संस्कृती रुजत राहिली.पण याच काळात " शारीरिक शिक्षणावर भर देण्यात यावा हे स्पष्ट मत सर विल्यम हंटर यांनी आपल्या आयोगात केलं होतं...
   जर भारताला सुधारणा द्यायच्या असतील तर शारीरिक शिक्षणावर दुर्लक्ष करता कामा नये.कारण तेव्हा ब्रिटिश साम्राज्यात क्रिकेट खेळाचा विकास होत होता ग्रीक संस्कृती याला कारणीभूत ठरली होती, तेव्हापासूनच "प्राथमिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण देणे आवश्यक आहे हे त्यांनी सांगितले, त्यासाठी प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षक नियुक्त करण्यात यावा हे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले होते...
    शारीरिक क्षमता ओळखण्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात योजना तयार केल्या होत्या त्या काळात तरी व्यवस्थित होत्या ,असे मला वाटतं कारण जी आजच्या घडीला "एवढा मोठा पुस्तकांचा भोजा सरकारने विद्यार्थ्यांनच्या डोक्यावर देऊन अप्रत्यक्षपणे मानसिक छळ करत आहे .का म्हणून सरकार शारीरिक शिक्षणाला दुय्यम स्थान देत आहे,मागे तर निर्णय घेण्यात आला की शारीरिक क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी करून क्रीडा क्षेत्राचा विकास करू पाहत होती ,पण शारीरिक शिक्षकांच्या संघटन शक्तीमुळे धुळीस मिळाले. का म्हणून सरकार क्रीडा विषयी अन्याय धोरण निश्चित करू पाहत आहे? 

      इंग्रजांनी 1882 मध्ये शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत खुप सुंदर असा पैशाचा निधी मंजूर केला होता आणि त्यावर खर्च केलाच,खुप चांगली व्यवस्था शारीरिक धोरणाविषयी होती पण ती स्वातंत्र प्राप्त झाल्या नंतर कमी अधिक होत गेली .....

 नुकताच महालेखापालांनी (कॅग) ने विधिमंडळात  खूपच संतापजनक क्रीडा धोरणाविषयी अहवाल सादर केला.100% मधून 1%ही निधी क्रीडा धोरणाला वापरला गेला नाही मग हा निधी गेला कुठे? हा प्रश्न आमच्या सारख्या खेळाडूंना पडला आहे ,आम्ही तुमच्या खोट्या आश्वासनला बळी पडून आमचा प्रवास आम्हीच थांबवला अस वाटतं कधी-कधी......

   जर तुम्हाला वाटतं असेल की शारीरिक शिक्षणाचा विकास करायचा आहे किंवा क्रीडा धोरण आखायचा आहे माझं खेळाडू म्हणून वैयक्तिक मत राहील, तर तुम्ही एकदा तरी हंटर कमिशनच्या (1882) चा अभ्यास करावा,कमी तरतुदी होत्या पण खुप चांगल्या पद्धतीने राबविण्यात आल्या.तो इंग्रज अधिकारी होता म्हणून काय झालं पण त्यात आपल्या भारतीय व्यक्तींनी मते नोंदवली होती ह्या कमिशनला 136 वर्षे लोटली गेली तरी ती माझ्या डोक्यात क्रीडा क्षेत्राचा विकास का? रोखला गेला या प्रश्नच्या उत्तर देण्यासाठी योग्य आहे...
     सरकारने निधी गेला कुठे हे दाखवून दिलं तर 1857 सारखा 2019 चा खेळाडूंचा उठाव होणार नाही.1857 चा उठाव हा राजकीय ,सामाजिक,आर्थिक कारणाने झाला.त्या उठवाचा अर्थ कोणी आपल्या पध्दतीने सांगतात   शिपाईचा उठाव! माणसाची गर्दी, स्वतंत्र समर, अश्या अनेक प्रकारे हा उठाव झाला पण 2019 उठाव निव्वळ खेळाडूंचा राहील हे लक्षात घ्यावे सरकारने........
   
    जर सरकारच्या एखाद्या व्यक्तीला क्रीडा विषयी कार्यक्रमात बोलवले तर ते अशी आश्वासने देतात की खेळाडू म्हणून जीवन खुप सुंदर आहे,पण उद्घाटन थाटात संपन्न होऊन मंत्री पाच वर्षांत कधी आठवण करत नाही की आपण काय आश्वासन दिलं होतं. कागदावर आम्हाला लिहून देतात आम्ही पूर्तता करू साहेब लिहून दाखवून काय तुम्ही विकसित क्रीडा क्षेत्राचा चेक देतात का ? मुद्द्यावर कोणीच बोलणार नाही फक्त फोटो घेऊन "क्रीडाविकास पुरस्कार" हे मंत्री घेतात.

 एकदा तरी 1882 च्या हंटर कमिशन सारखं उदारमतवादी  व्हावं या सरकारने जर मंत्री ज्या ठिकाणचा असेल तर तेथेच मैदान पळवून घेऊन जातो मग दुसरे कळे खेळाडू नाहीत का?

 लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की
*"स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारचं"*

 जर एखादा खेळाडू 
 "मैदानात खेळण्याचा माझा जन्म सिद्ध हक्क, आहे तो मी प्राप्त करणारचं " हे जर म्हटलं तर असू येईल. म्हणून कोणी लोकमान्य टिळक व्हायला तयार नाही पण मी व्हायला तयार आहे...
 
 महाराष्ट्र राज्याचे माननीय शिक्षण व क्रीडामंत्री श्री. विनोदजी तावडे यांनी इतिहासाचा अभ्यास करावा खास करून 1882 च्या हंटर कमिशनचा करावा ......येणाऱ्या प्रत्येक क्रीडामंत्रीनी हंटर कमिशन  अहवाल पाहावा हीच तुमची खरी पात्रता आहे..
   अहो मंत्री साहेब जर तुम्ही "शारीरिक शिक्षण"देण्यास तयार नसाल तर ऑलिम्पिक पदकाची आशा का करतात? तुम्ही कधी PT चा तास केला आहे का ?जर केला नसेल तर आता करता येणार नाही तुम्हाला कारण तुमचं वय नाही तुमची पात्रता रद्द करण्यात आली ......साहेब आता तरी नका घेऊ लहान मुलांचा हक्क "मैदानावर येऊ द्या त्यांना रोज एवढा मोठा शिक्षणाचा भोजा नको "आता पासूनच छळ केला तर ह्या मुलांचं आयुष्य पुढे काय राहील..

जरा मराठी साहित्य उपलब्ध करून द्या .... ते इंग्रज गेले निघून 1947 ला पण तुम्ही तरी नका होऊ इंग्रज सरकार .

एका इंग्रज म्हणतो *"like this indian sports "*
 तो म्हणतो 'काय भारतीयांचे खेळ  योग्य दिशादर्शन,गती चपळता, मिश्रण, घट्ट पकड,मजबूत ताकद,योग्य शरीर रचना, योग्य व्युरचना, मसुदी निर्णय क्षमता, व्हा ! जर हेच ब्रिटिशांच्या कडे असते तर जगावर क्रीडा क्षेत्रात राज्य केलं असतं. एक इंग्रज खेळ भारतात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.मग भारताचा खेळ इंग्लिश राज्यात कितव्या क्रमांकावर आहे.हा प्रश्न उपस्थित होतो पण सत्य तर हे आहे महाराष्ट्राचा खेळ आपल्यालाच माहीत नाही हे तर इंग्रजांना काय माहीत राहणार आहे, दुर्दैवाने सांगावं लागतं की !का माहीत नाही यांची कारण तर शालेय जीवनातूनच पूरक अश्या शारीरिक शिक्षणाची अंमलबजावणी केली गेली नाही,हेच माझ्यामते योग्य कारण आहे.
 
 अनेक पुरस्कार प्रदान करतात पण कधी शारीरिक शिक्षकाला पुरस्कार जाहीर केला का? दिला असेल पण कोणाला तर माहिती झालं का???
 
 अशी वेळ नको येवो शारीरिक शिक्षण शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे...धोरण निश्चित करा मंत्री साहेब हंटर कमिशन बघा...खुप चांगला व्यक्ती होता तो मी गोष्ट सांगत नाही आणि सांगतही फक्त एक प्रश्न उपस्थित केला आहे.
 1882 सारखी शारीरिक शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात राबविण्यात येणार का?
 
  कारण त्रास होतो
 
 ज्याच्याकडे पैसा आहे तो क्रीडा क्षेत्राकडे कोणत्या तरी विचाराने बघतो हे त्यालाच माहिती
पण
एखादा गरीब खेळाडू क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याच्या मार्गावर असतांना पैशाची चणचण होते मार्ग निघत नाही? याही गोष्टी कडे लक्ष केंद्रित करा....
 असेच या पद्धतीचे मत 1882 च्या हंटर कमिशनने व्यक्त केलं होतं...
 

 *"शारीरिक क्रीडा शिक्षण "* या अभ्यासक्रमाची सुरवात करावी. पेपर ही घ्या याच्यामुळे क्रीडा क्षेत्राचा विकास होईल.

 मागे तुमच्या चुकीच्या शारीरिक शिक्षणाच्या धोरणामुळे पालक वर्गही क्रीडा क्षेत्राकडे पाट फिरवण्यास मजबूर झाला.त्यांनीही आपल्या मुलांवर *"पुस्तकी शिक्षणशाही"* का राबविण्यात आली यांची उत्तरे तुमच्याकडे आहेत मंत्री साहेब
   अनेक पालकांना असं वाटतं की मुलांचे भविष्य क्रीडा क्षेत्रात नाही असं का ?वाटतं हो मंत्री साहेब !
 याला कारणीभूत ठरते ती 2012 ते 2017 च्या दरम्यान राबविण्यात आलेली "शारीरिक क्रीडा शिक्षण धोरण" ही मागे दुय्यम स्थान पद्धतीने होती म्हणून तर महालेखापाल तुमच्यावर अप्रत्यक्ष हल्ला केला.. तरी तुम्ही त्यावर काही उत्तर देण्याचे टाळले.
    हे माझं उदा.
       साहेब कधी पाच रुपयाला एक प्लॅस्टिकचा बॉल घेण्यासाठी घरात भांडणं करावं लागलं नाही पण आज परिस्थिती अशी आहे की तोच प्लॅस्टिकचा बॉल आज 10 रुपयाला आहे,तो घेण्यासाठी आज खुप मेहनत करावी लागते....ही परिस्थिती आज कशामुळे !!!!!!!!!!!!?????????

 *सविस्तर चर्चा शिक्षण व क्रीडा मंत्रीशी करण्यासाठी आज एक संघटित शक्ती दाखवा. नाही तर धक्कादायक निर्णय ऐकण्यासाठी तयार रहा......*


🎯क्रीडा क्षेत्राचा विकास🎯

Comments

Popular posts from this blog

🚩शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी "विजेंद्र जाधव" यांची प्रशिक्षक म्हणून निवड🥊