Posts

Showing posts from December, 2023

‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️

Image
 ‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️ ‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️ "मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पालकांनी सुध्दा प्रयत्न करायला हवा." 📚⚽🚩🖋️🏆🥇 (- भरत कोळी, शारीरिक शिक्षण शिक्षक,धुळे)         "परीक्षेच्या दृष्टीने मुलांना वाचन संस्कृतीकडे नेण्याची नितांत गरज आहे,कारण आजच्या वाढत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे पेपर लिहितांना बऱ्याच अडचणी मुलांना येतात,वाचतांना देखील अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे प्रश्न समजत नाही, खरंतर आजच्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेण्याचा रसच दिसत नाही अशी परिस्थिती शालेय स्तरावर आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून निकालावर येत असतो आणि पालकांची ओरड होते की शिक्षक लक्ष देत नाही, शिकवत नाही,खेळांमुळे मार्क कमी मिळाले,अभ्यासाचे नुकसान झाले अशी काही परिस्थिती बघायला मिळते,खरंतर खेळांचा आणि परीक्षेचा जवळचा संबंध आहे खेळ मुलांचा ताणतणाव दूर करण्यास विशेष भुमिका पार पाडतो, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते मग खेळामुळे कसे काय मार्क कमी पडू शकतात..? हा मला पडलेला प्रश्न आहे.वि