‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️
‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️
‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️
"मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पालकांनी सुध्दा प्रयत्न करायला हवा."
📚⚽🚩🖋️🏆🥇
(- भरत कोळी, शारीरिक शिक्षण शिक्षक,धुळे)
"परीक्षेच्या दृष्टीने मुलांना वाचन संस्कृतीकडे नेण्याची नितांत गरज आहे,कारण आजच्या वाढत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे पेपर लिहितांना बऱ्याच अडचणी मुलांना येतात,वाचतांना देखील अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे प्रश्न समजत नाही, खरंतर आजच्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेण्याचा रसच दिसत नाही अशी परिस्थिती शालेय स्तरावर आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून निकालावर येत असतो आणि पालकांची ओरड होते की शिक्षक लक्ष देत नाही, शिकवत नाही,खेळांमुळे मार्क कमी मिळाले,अभ्यासाचे नुकसान झाले अशी काही परिस्थिती बघायला मिळते,खरंतर खेळांचा आणि परीक्षेचा जवळचा संबंध आहे खेळ मुलांचा ताणतणाव दूर करण्यास विशेष भुमिका पार पाडतो, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते मग खेळामुळे कसे काय मार्क कमी पडू शकतात..? हा मला पडलेला प्रश्न आहे.विशेष म्हणजे त्यांचा सर्वांगिण विकासाचा प्रवाह खेळामुळेच गतिमान होतो हे लक्षात आपण घेतलं पाहिजे,शालेय स्तरावर त्यांना शारीरिक व खेळासंबधित सर्व उपक्रमात सहभागी होण्याचा १००% अधिकार आहे तो आपण घेऊ शकत नाही पण "खेळामुळे परीक्षेचा गुणांवर परिणाम होतो अशी खापर हांडी फोडणे निव्वळ चुकीचं आहे."
दिवसभरात मुलांची १ किंवा २ तास शारीरिक क्रिया व खेळातून सक्रिय हालचाल होणं गरजेचं आहे कारण त्यांच्या मूलभूत कारक हालचालींचा विकास व कारक कौशल्याच्या विकासासाठी,खेळामुळे कोणताही परिणाम अभ्यासावर होत नाही फक्त त्याचा अवलंब आपण कसं करत आहोत ही गोष्ट आपण मुलांना दाखवली पाहिजे,खरंतर आपली शिक्षणव्यवस्थाच याला जवाबदार आहे,परीक्षेचं गांभीर्य आजच्या शालेय स्तरावर आधी सारखी दिसत नाही मग ८ वी पर्यंत पुढच्या वर्गात ग्रेड देऊन पाठवणे यामुळे मुलांचे परीक्षेकडे होत चाललेलं दुर्लक्ष अशा अनेक भूमिकेतून आपल्या शिक्षण पद्धतीचा प्रवास याला जवाबदार आहे आणि याने नक्कीच मुलांचे भविष्य घडेल का..? हा विचार पालकांनी करायला हवा,मुलांना दप्तराच्या ओझ्यातून थोडं मुक्त करा, ऑनलाइनच्या आभासी दुनियेतून बाहेर काढा, निर्गसाच्या सानिध्यात वावरू द्या, पुस्तकांचा छंद लागला पाहिजे अशी परिस्थिती तयार करण्यास पाऊले उचला त्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याने सुदृढ बनवा,निरोगी राहण्यासाठी किमान एक तास मैदानावर पाठवा,मुलांचे भविष्य गुणांवर ठरवू नका तो समाजात स्वाभिमानाने,निर्व्यसनी राहिल सुदृढ राहिल,देशाच्या विकासात हातभार लावेल आणि सामजिक मूल्य समजत समाजाला तुम्हाला मदत करेल असा व्यक्ती होण्यास त्याला आपण मदत करू या.
"🙏मार्क कमी मिळाले म्हणून खेळावर खापर हांडी फोडण्यापेक्षा त्याने खरचं अभ्यास केला का..? पेपर लिहिला का.?, वेळेचं नियोजन केलं का..? पुस्तकं वाचली का..? प्रश्न समजून घेतला का..?परीक्षेचं गांभीर्य आहे का..? ८ वी पर्यंत सहज पास करुन देण्यामुळे तर परीक्षेचं टेन्शन घेत नाही तर ना..? सहजवृत्ती मुलांमध्ये वाढल्याने सर्व गोंधळ होतोय हे पालक म्हणून समजुन घेण्याची गरज आहे.
‼️म्हणून माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांना वाचन संस्कृतीकडे न्या.🙏
‼️🙏‼️
भरत कोळी
(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहिल.)

Comments
Post a Comment