मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार


महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मा. प्रवीण दरेकर साहेब आणि मा. जय कवळी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व २७ जागांवर विजयी होत ऐतिहासिक कामगिरी केली. संपूर्ण पॅनेलचा हा एकमताचा विजय महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्रीडा क्षेत्रातील विश्वास, संघटित बळ आणि पारदर्शकतेचे द्योतक ठरला आहे.


या दणदणीत विजयानंतर विजयी उमेदवारांनी वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करून विशेष शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्रातील क्रीडा विकासासाठी नव्याने निवडून आलेले पदाधिकारी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि खेळाडू-केंद्रित कार्य करतील, असा विश्वास मा. फडणवीस साहेबांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५