महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुंबई :

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक आज मुंबईत उत्साहात संपन्न झाली. या निवडणुकीत आमदार प्रविण दरेकर हे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले असून त्यांना तब्बल ४३ मते मिळाली. तर धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्षपदावर ४३ मते मिळवत आपला विजय नेतृत्व सिद्ध केले. धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे हे विभागीय सचिवपदी बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा वर्तुळात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. या निवडणुकीत प्रामाणिकपणा, कष्ट आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा यांचे वर्चस्व दिसून आले. स्पर्धा चुरशीची असली तरी अखेरीस संघटनात्मक एकतेचा आणि स्वच्छ कारभाराचा विजय झाला. राज्यभरातून आ. जय कवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला असून महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळ नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला आहे. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









Comments

Popular posts from this blog

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार