Posts

Showing posts from January, 2025

जय कवळी यांना निलंबन करण्याचा आदेश रद्द.

Image
मुंबई उच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्ती सुश्री रेवती मोहिते डेरे आणि सुश्री नीला केदार गोखले यांच्या खंडपीठाने बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया या बॉक्सिंगच्या भारतीय महासंघाचे प्रमुख संस्थापक आणि माजी सरचिटणीस श्री. जय कवळी यांच्याविरुद्धचा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा आणि त्यांच्या शिस्तपालन समितीने दिलेल्या अहवालावरून केलेल्या निलंबनचा आदेश रद्द केला ! या प्रकरणातील सर्व मुद्दे लक्षात घेता न्यायमूर्तीने असे नमूद केले की ८ जानेवारी २०२२ रोजीच्या विवाद आणि शिस्तपालन आयोगाचे निष्कर्ष आणि शिफारशी रद्द करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही ! " कार्यकारिणीने १० जानेवारी २०२२ च्या बैठकीत निलंबनाशी संबंधित ठराव पारित केला होता. फेडरेशन आणि त्याच्या संलग्न युनिटमधील कोणत्याही बॉक्सिंग क्रियाकल्पांपासून याचिकाकर्ते आणि त्यांना त्यानुसार बाजूला ठेवले गेले होते. शेवटी खंडपीठाने असेही जोडले की, " निर्णय सुनावल्यानंतर, प्रतिवादी फेडरेशनच्या ( BFI ) च्या वकिलांनी आज दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. आदेशात नोंदवलेले निष्कर्ष लक्षात घेऊन त्यांची...