जय कवळी यांना निलंबन करण्याचा आदेश रद्द.



मुंबई उच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्ती सुश्री रेवती मोहिते डेरे आणि सुश्री नीला केदार गोखले यांच्या खंडपीठाने बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया या बॉक्सिंगच्या भारतीय महासंघाचे प्रमुख संस्थापक आणि माजी सरचिटणीस श्री. जय कवळी यांच्याविरुद्धचा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा आणि त्यांच्या शिस्तपालन समितीने दिलेल्या अहवालावरून केलेल्या निलंबनचा आदेश रद्द केला !


या प्रकरणातील सर्व मुद्दे लक्षात घेता न्यायमूर्तीने असे नमूद केले की ८ जानेवारी २०२२ रोजीच्या विवाद आणि शिस्तपालन आयोगाचे निष्कर्ष आणि शिफारशी रद्द करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही ! "


कार्यकारिणीने १० जानेवारी २०२२ च्या बैठकीत निलंबनाशी संबंधित ठराव पारित केला होता. फेडरेशन आणि त्याच्या संलग्न युनिटमधील कोणत्याही बॉक्सिंग क्रियाकल्पांपासून याचिकाकर्ते आणि त्यांना त्यानुसार बाजूला ठेवले गेले होते.


शेवटी खंडपीठाने असेही जोडले की, " निर्णय सुनावल्यानंतर, प्रतिवादी फेडरेशनच्या ( BFI ) च्या वकिलांनी आज दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. आदेशात नोंदवलेले निष्कर्ष लक्षात घेऊन त्यांची ही विनंती सुद्धा आम्ही नाकारत आहोत असे स्पष्टपणे नमूदही केलेय. "


ॲड. सागर पवार / एसके लीगल असोसिएट्स यांचेतर्फे ॲड. निकिता जेकब यांनी याचिकाकर्ते श्री. जय कवळी यांच्या वतीने लढा दिला. त्याआधी ॲड पंकज राजमाचीकर आणि ॲड. असीम नाफडे यांनीही श्री. कवळी यांना बीएफआयच्या निलंबना विरुद्धच्या लढ्यात सुरुवातीच्या टप्प्यावर मदत केली होती.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

"धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास म्हणजे संघर्षमय आणि प्रेरणादायी... "