'वाद राज्य संघटनेत,समिती जिल्ह्यात- सत्ता संघर्ष'
'वाद राज्य संघटनेत,समिती जिल्ह्यात- सत्ता संघर्ष' राज्यात एखादा खेळ वाढविण्यासाठी राज्य क्रीडा संघटनेची फार मोठी भूमिका किंवा जवाबदारी असते,त्यात खेळाबाबत ध्येय,धोरणे तयार करणे,नियम,अटी बनविणे,खेळाच्या विकासाठी जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हा क्रीडा संघटना स्थापन करून त्यांना खेळाचा प्रचार-प्रसारासाठी योग्य ते मार्गदर्शन करून वेळोवेळी संधी देत राहणे ही फार मोठी जवाबदारी राज्य क्रीडा संघटनेची असते,खरंतर जिल्ह्यातील संबंधित खेळामध्ये कार्यरत असलेल्या क्रीडाप्रेमींना व माजी खेळाडूंना हाताशी धरून जिल्ह्यात सदर खेळ कसा वाढेल तेथून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदक विजेते खेळाडू कसे तयार होतील असे हेरणारे कार्यकर्ते शोधून पाठबळ देण्याची गरज असते,खेळाचा योग्य प्रचार व प्रसारासाठी जिल्हा संघटना मैलाचा दगड असतो हे लक्षात घेऊन राज्य संघटना असावी,जिल्हा संघटनांची योग्य ती बांधणी करावी,योग्य लोकांना संधी द्यावी विशेष म्हणजे खेळ जास्तीत-जास्त राजकारणापासून दूर राहील ही काळजी घेणं अपेक्षित असतं,पण खेळाच्या विकासासाठी आश्रयदाते राजकारणी लागतातंच यात माझं दुमत नाह...