"धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास म्हणजे संघर्षमय आणि प्रेरणादायी... "

धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास हा सहज नाही, अगदी तळागळातून व सामान्य गरीब कुटूंबातील मुलं जेव्हा बॉक्सिंग खेळाकडे वडत 'बॉक्सिंग खेळाचं रोपट्यापासून एक सुंदर झाड' तयार झालं तेंव्हा ही संघटना बॉक्सिंग खेळात बहुमोल कार्य करत होती, खरंतर जिल्ह्यात बॉक्सिंग खेळासाठी मयूर बोरसे सारख्या कार्यकर्त्याने स्वतःचं युवा भविष्य बॉक्सिंगसाठी २००८ पासून ते आजपर्यंत काटेरी प्रवास केला असं म्हणायला हरकत नाही व तो आजही अधिक जोमाने पुढे सुरूचं आहे, गेल्या १६-१७ वर्षांत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप कठीण प्रसंगांचा सामना सामोरे करत बॉक्सिंग खेळात पदके जिंकली तर हा खेळ धुळे जिल्ह्यात वाढविण्यात मोलाचं योगदान दिलं, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा संघर्षमय प्रवास हा सहज कोणाच्या लक्षात येणार नाही पण ज्यांनी ह्या प्रवासाला जवळून पाहिलं आहे त्यांना नक्कीचं अभिमान वाटेल,संपूर्ण महाराष्ट्रभर धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेची ओळख निर्माण करण्यात जिल्ह्याचे महासचिव मयूर बोरसे यांनी सिंहाचा वाटा उचलला, खेळाडू,प्रशिक्षक आणि पदाधिकारी म्हणून त्यांची भूमिका अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी असेल त्यांनी आपल्या आयुष्यातील १६-१७ वर्षे या संघटनेसाठी समर्पित केली,आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींना न जुमानता त्यांनी हा प्रवास आजही सुरूचं ठेवला आहे, नोकरीला कुठंही असो पण बॉक्सिंगसाठी कायमचं त्यांनी पुढाकार घेतला ही मोठी गोष्ट संघटनेसाठी आहे.

मी देखील गेल्या १५-१६ वर्षांपासून त्यांचा प्रवास हा जवळून पाहतोय, सरांसोबत बॉक्सिंगसाठी कार्यरत असतो, सरांनी सुरू केलेल्या पहिल्या बॉक्सिंग अकॅडमीचा मी पहिला खेळाडू असून, आजही त्यांच्यासोबतच कार्य करतो आणि पुढेही करत राहील हा माझ्यासाठी निःस्वार्थ अभिमान एक खेळाडू म्हणून कायम राहील आणि माझ्यासारखे असंख्य खेळाडू आजही त्यांच्यासोबत आहेत आणि भविष्यातही असतील ही धुळे जिल्हा संघटनेची पोच पावती आहे,सदर भावना ह्या माझ्या मनातील प्रेम,आदर आणि संघर्षशील अशा व्यक्तीसाठी आहे, जो एका बॉक्सिंग संघटनेसाठी निःस्वार्थपणे लढतो,मी काही दुर्मीळ छायाचित्रं यांच्यासोबत जोडत आहे,ज्यातून धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा खडतर प्रवास स्पष्टपणे दिसून येईल.... आजपासून गेल्या दहा वर्षांपूर्वी मयूर बोरसे सर आणि त्यांचे सहकारी स्वतःच्या खर्चातून गावोगावी, शाळाशाळांमध्ये जाऊन बॉक्सिंगचा प्रचार करत होते.त्यांनी गरीब,आदिवासी आणि अनाथ खेळाडूंना संधी देऊन त्यांना स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले,त्यांच्या कष्टांना उत्तर म्हणून या खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदके मिळवून दिली आणि त्यांचा हा सन्मान खेळाडूंनी राखला.

जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय खेळाडू व गुणवत्ताधारक खेळाडू तयार व्हावे आणि त्या दृष्टीने बॉक्सिंग संघटना अधिक मजबूत व्हावी म्हणून NIS बॉक्सिंग प्रशिक्षक तयार केलेत तथा महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अधिकृत CCCP बॉक्सिंग प्रशिक्षक व RJCCP रजिस्टरड जजिंग आणि कोचिंग कोर्स करून घेण्यात आले, यामुळे आज धुळे जिल्ह्याच्या संघटनेत राज्यस्तरीय पंच व प्रशिक्षक निर्माण झाले आहेत.


पण अलीकडेच काही लोकांनी द्वेष म्हणून किंवा राजकारण म्हणून एक नवी समिती स्थापन करून संघटनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ते जरा हे अवघडचं आहे असो पण त्यांना आमच्या शुभेच्छा, गेल्या १६- १७ वर्षांपासून आम्ही वेळ,पैसा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा त्याग करून कार्य करणाऱ्या या संघटनेच्या कामाची किंमत काय असू शकेल हे नक्कीच जाणून घ्यावे.


🙏आपलाचं🙏

भूषण पवार

बॉक्सिंग खेळाडू | RJ | औषध निर्माता























Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५