शाळा --> खेळ --> नौकरी

 *शाळा --> खेळ --> नौकरी*




मित्रांनो हे वरील शीर्षक वाचून बऱ्याचं लोकांच्या लक्षात आले असेल की मला नेमकं काय सांगायचं आहे किंवा काय सुचवायचे आहे...

 

२०१४ नंतर शासनाकडून क्रीडासाठी चांगले प्रोत्साहन आहे,खेळ सगळ्यांनी खेळावेत त्यामाध्यमातून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करावा यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत. परंतु किती सरकारी अधिकारी किंवा नौकरी करणारे कर्मचारी हे किती टक्के खेळ खेळतात/खेळ खेळले आहेत...हे पाहणं फार महत्त्वाचे आहे.


जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक व्यक्तीने खेळ खेळला पाहिजे तसेच मी म्हणेल भविष्यात कोणतीही नौकरी देतांना किंवा मुलाखतीच्या वेळेस प्रत्येक सदस्याला शैक्षणिक पात्रता विचारण्यासोबत खेळातील पात्रता व त्याचे प्रमाणपत्र देखील बघितली पाहिजे व प्रत्येक कर्मचाऱ्याला कामास रुजू करण्यापूर्वी तो खेळाडू आहे याची पूर्तता देखील केली पहिजे...


*#तेव्हा आपण गर्वाने म्हणू शकतो.#*

👇👇👇👇👇

*(खेळाडू ते ........ हा प्रवास सुरू राहील.)* 👈ह्या वाक्यात प्रचंड ध्येय आहेत म्हणून सर्वांनी विचार करावा आणि आपल्या पिढीला खेळाकडे वळवावे.


ऋषिकेश अहिरे


🏆🥇🥈🥉🏅🎖️

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

🚩शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी "विजेंद्र जाधव" यांची प्रशिक्षक म्हणून निवड🥊

हंटर कमिशन 1882 (भारतीय शिक्षण सुधारणा आयोग) यांनीही "क्रीडा क्षेत्राचा विकासास भर दिला.