*भरत कोळी* *(शारीरिक शिक्षण शिक्षक,धुळे/बॉक्सिंग प्रशिक्षक)* * "पालकांनो मुलांकडे दुर्लक्ष करू नका.." * धुळे- २१ व्या शतकातील आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवन हे धावत्या ट्रेनप्रमाणेचं वेगवान असेल असं मला कधी वाटलं नव्हतं, खरंतर महामूर्ख कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मानवी समाजाची जी गतिशील वाटचाल सुरू झाली ती मानवाला कुठं नेऊन सोडेल याची शाश्वती देता येणार पण २१ व्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपण विविध प्रकारे अधिकाधिक सर्तक असणं आवश्यक आहे कारण कधी कोणत्या संकटांना सामोरे जावं लागेल हे सांगता येणं ही थोडं अवघडच आहे, असो पण आजच्या आधुनिक युगात मानवाची वाटचाल ही गरजेनुसार व परिस्थितीनुसार निरंतर चालणारी प्रक्रिया हवी, पण हल्ली या प्रक्रियेचा हेतू बदलत एका विशिष्ट तऱ्हेने समाजाची वाटचाल ही अधोगतीकडे जात आहे की काय अशी वेळोवेळी शंका-प्रश्न निर्माण होतात, आजच्या २१ व्या शतकातात जरी विज्ञान,तंत्रज्ञानाच्या आधारावर आधुनिकीकरणाला, जागतिकीकरणाला, खाजगीकरणाला गती मिळाली असली तरी ती गती समाजासाठी फायदेशीर ठरेलचं अशी १००% शाश्वती देता येणं ही माझ्यामते कठीणचं आहे,म्