*"महाराष्ट्रात बॉक्सिंग खेळाचं समीकरण."* (भाग १) धुळे - आजचा महाराष्ट्र हा कालच्या महाराष्ट्रापेक्षा बराच वेगळा दिसतो,शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक, क्षेत्रात झालेली प्रगती,विज्ञान तंत्रज्ञानाने विकसित उद्योगात आधुनिकीकरण अशा विविध बाबीमुळे देशात महाराष्ट्राचे स्थान अनेक बाबीत इतर राज्यांपेक्षा बलाढ्य होत आहे, विविध क्षेत्रात महाराष्ट्राची वाटचाल ही अधिक वेगाने विकसित होत असल्याने भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कसा असेल याचं आपण जिवंत उदाहरण म्हणून मुंबई,पुणे, नागपूर,औंरगाबाद अशा ठिकाणी होत असलेल्या विकासावरून लक्षात येईल,असो पण क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्राची वाटचाल ही तळागळातील क्रीडा सक्षमीकरणाकडे होत असल्याची चित्र दिसत आहे, याच उत्तम उदाहरण म्हणून दिल्ली,पुणे,आसाम येथे झालेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेवरून घ्यावं लागेल,नुकत्याच गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवरून बऱ्याच बाबी लक्षात येत,बालेवाडी(पुणे) येथे तयार होणारे क्रीडा विद्यापीठ अशी क्रीडा वाटचाल विविध खेळांच्या विकासासाठी पोषक ठरत आहे,