सत्यशोधन प्रश्नावली
*सत्यशोधन प्रश्नावली :*
बघुया तर किती माहिती आहे आपल्याला आपल्या आवडीच्या खेळाच्या - तसेच आपल्या संघटनेच्या उत्पत्तीविषयी ?
*१ . भारतात बॉक्सिंग कधी व कुठे सुरू झाली?*
उत्तर : पहिला बॉक्सिंग सामना हा कलकत्त्यात १९ व्या शतकाच्या सुरुवातीस खेळला गेला - परंतु संघटीत बॉक्सिंग चळवळीची अंतास १९२५ साली मुंबईत झाली.
*२ . महाराष्ट्रात बॉक्सिंग कधी व कुठे सुरू झाली?*
उत्तर : कलकत्त्यासोबत किंवा पाठोपाठ मुंबईतही बॉक्सिंग सामने होत होते - परंतु महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत या महाकाय देशातील संघटीत बॉक्सिंगची सुरुवात मुंबई येथे सन १९२५ साली झाली.
'बॉम्बे प्रेसिडेन्सी अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन' ( BPABA ) या त्या भारतातील पहिल्या बॉक्सिंग संघटनेचे नाव - पुढे जाऊन या संघटनेचेच 'महाराष्ट्र स्टेट अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन' ( MSABA ) / 'महाराष्ट्र ~स्टेट~ अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन' ( MABA ) / 'महाराष्ट्र ~अमॅच्युअर~ बॉक्सिंग असोसिएशन' ( MBA ) इ मधे रूपांतर होत गेले.
*३ . भारतीय बॉक्सिंग महासंघाची सुरुवात कधी व कुठे झाली?*
उत्तर : कलकत्ता येथे सन १९४८ साली. 'इंडियन अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशन' ( IABF ) हे त्याचं शीर्षक / नाव.
*४ . महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेची स्थापना कधी झाली व कुठे झाली? त्याचे अध्यक्ष कोण होते व संस्थापक सदस्य कोण होते?*
उत्तर : महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेची स्थापना सन १९८० साली मुंबईत झाली.
मा. श्री. शरद पवार हे पहिले अध्यक्ष होते व तत्कालीन महाराष्ट्र बॉक्सिंगची संघटना : 'बॉम्बे प्रेसिडेन्सी अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन'ही संस्थापक सदस्यांपैकी एक होय !
*५ . महाराष्ट्र अमॅच्युअर बॉक्सिंग संघटनेचे आधीचे नाव काय होते?*
उत्तर : 'बॉम्बे प्रेसिडेन्सी अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन'
*६ . 'एम.ए.बी.ए.'चे रजिस्ट्रेशन कधी झाले?*
उत्तर : १९८३ साली
*७ . 'एम.ए.बी.ए.' चे 'एम.बी.ए.' का झाले . . . व कधी झाले ?*
उत्तर : २१ व्या शतकाच्या सुरुवातीस हौशी ( अमॅच्युअर ) व व्यावसायिक ( प्रोफेशनल ) बॉक्सिंग च्या एकीकरणाच्या विचारांचे वारे जगभर वाहू लागले होते. आपली जागतीक संघटना म्हणजेच 'आयबा' ( Association Internationale De Boxe Amateur - AIBA ) ने सुध्दा २००६ साली 'अमॅच्युअर' हा शब्द आपल्या शिर्षकातून काढून टाकला.
त्यास अनुसरून त्याच काळात 'महाराष्ट्र अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन' ( MABA ) ने सुद्धा आपल्या शीर्षकातून 'अमॅच्युअर' हा शब्द गाळून MABA चे MBA करण्याचा निर्णय घेतला.
. . . . . . . . . . .
*इतिहास कळला*
*तर वर्तमान समजेल*
*वर्तमान समजलं*
*तर भविष्यवेध जमेल 🥊*
- जय कवळी सर
Comments
Post a Comment