जयहिंद इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव साजरा.


खेळामुळे शारीरिक व मानसिक क्षमता जलद विकसित होतात- दादासाहेब डॉ. श्री.अरुण साळुंखे


धुळे - धुळे येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित जयहिंद इंग्लिश स्कूलमध्ये २०२२-२३ या शैक्षणिक दादासारखे वर्षातील वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच २७ ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान भव्य-दिव्य साजरा करण्यात आला,या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष *दादासाहेब डॉ. श्री. अरुण साळुंखे* यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष *भाऊसाहेब श्री. प्रमोद पाटील*, सचिव *दादासाहेब श्री. प्रदीप भदाणे*, जयहिंद इंग्लिश स्कूलचे चेअरमन *नानासाहेब श्री. नानाभाऊ कौर*, विश्वस्त *तात्यासाहेब श्री. वसंतराव ईशी* सर व *रावसाहेब श्री. शेखर सुर्यवंशी* सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले दादासाहेब डॉ. श्री. अरुण साळुंखे यांच्याहस्ते क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले तर शालेय क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडूंनी क्रीडा ज्योत (मशाल) शाळेच्या प्रांगणात आणत क्रीडा महोत्सवाचे उपस्थित प्रमुख पाहुणे श्री.प्रमोद पाटील यांच्याहस्ते स्थापन केली. या क्रीडा ध्वजाचे नेतृत्व भाविका पाटील व अनस खान याने केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करतांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. चैतन्य भंडारी यांनी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचा अहवाल आपल्या प्रास्ताविकेत सांगताना खेळाडूंनी मिळविलेल्या यशाने शाळेचा मान उंचावला असे सांगीतले. जयहिंद इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी म.न.पा.,विभाग व राज्य स्तरावर झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत यश मिळविलेल्या व सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे कौतुक केले.१४ वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाने शालेय क्रीडा स्पर्धेत मिळविलेले उपविजेतेद हे आमच्या विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देत राहील अशा शब्दांत त्यांनी आपल्या क्रीडा अहवालात मत व्यक्त केलं.

             या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात शाळेच्या नर्सरी ते दहावीच्या मुला-मुलींनी वेगवेगळ्या प्रकारच्या मैदानी अडथळा शर्यती स्पर्धेत सहभागी होत विजयाचा आनंद घेतला,एकूण ७ ते ८ प्रकारच्या अडथळा शर्यतीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. अशा शर्यतीचे आयोजन शालेय स्तरावरील क्रीडा महोत्सवात करण्यामागे आमचे पुढील ध्येय ही होती भविष्यासाठी मुलांना शारीरिक व मानसिक क्षमतेने सक्षम बनवणं, त्यांच्या क्रीडापंखांना बळ देणं, खरंतर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक क्षमता विकसित व्हाव्यात, त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा, जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर त्यांनी सहज मात करावी, त्यांच्या क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा या "सर्वांगीण विकासाच्या"दृष्टीने जयहिंद इंग्लिश स्कूलच्या २०२२-२३ चा क्रीडा महोत्सव अतिशय नाविन्यपुर्ण स्वरूपाचा होता. अशा अडथळा शर्यतीचे आयोजन प्रथमचं जिल्ह्यात करण्यात आले असावे. क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी क्रीडा ध्वजासह क्रीडा रॅली शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातून काढण्यात आली होती. ह्या रॅलीत खेळाच्या माध्यमातून भारत जोडो, फिट इंडियाचे व आरोग्याबाबतचे व क्रीडा विषयक जनजागृतीचे संदेश शाळेतील विद्यार्थ्यांनी या क्रीडा रॅलीत दिले. त्याचबरोबर सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला लेझिम पथक तळागळापर्यंत चांगलेच रुजले आहे, याचे उत्तम उदाहरण आमच्या जयहिंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत दैवत छत्रपती या गाण्यावर स्वतिक, नारी शक्तीचे सामर्थ्य, संघटित शक्तीचे बळ असे दृश्य नृत्याच्या माध्यमातुन सादर केले. त्याचबरोबर सध्याच्या धावपळीच्या जीवनात व दैनंदिन व्यवहारात व्यायामाचे किती महत्व प्राप्त झाले आहे, हे आमच्या लहान गटातील विद्यार्थ्यांनी उबंटू या गाण्यावर बसवलेल्या एक्सरसाइज डान्सच्या माध्यमातुन पटवून दिले. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी लेझिमपथक, एक्सरसाइज डान्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर करत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा जोष वाढवला.

         या दोन दिवस रंगलेल्या क्रीडा महोत्सवात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग नोंदवत आनंद व्यक्त केला, दुसऱ्या दिवशीच्या क्रीडा समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील व नानासाहेब कौर उपस्थित होते, प्रमुख पाहुण्याच्या हस्ते रंगोत्सवाचे व रॅपिड इंग्लिश स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. या क्रीडा महोत्सवाचे समारोपाचा कार्यक्रम एरोबिक व्यायाम डान्सने करत,शाळेचा फुटबॉल खेळाडू यशकुमार याने क्रीडा ध्वज सन्मानपूर्वक शाळेचे मुख्याध्यापक चैतन्य भंडारी यांच्याकडे सुपूर्त करत क्रीडा महोत्सवाचा समारोप करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जोशी मॅडम, स्वाती देवरे मॅडम, निलोफर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती देवरे यांनी संस्कृत भाषेत केले. या संपूर्ण क्रीडा महोत्सवाचे यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चैतन्य भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अमूल्य असे योगदान दिले.

शिक्षकेतर 


"जीवनात खेळाची फार मोठी भूमिका आहे, खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे शालेय जीवनात खेळाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेत रहावा."

- डॉ. अरुण साळुंखे

(अध्यक्ष - जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट,धुळे)



"खेळामुळे शारीरिक व मानसिक बळ मिळतं, खेळात मिळालेल्या अपयशाने खचून न जाता अधिक जिद्दीने मैदानावर लढण्याची प्रेरणा जर घ्यायची असेल तर दररोज मैदानावर एक तास खेळत रहा."


श्री.प्रमोद पाटील

(उपाध्यक्ष - जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट,धुळे)






Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५