जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा संपन्न
जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा संपन्न हस्ती पब्लिक स्कूल क्रीडा संकुल दोंडाईचा येथे झालेल्या धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन, हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त भव्य बॉक्सिंग स्पर्धेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष वैशाली महाजन माजी सभापती पाणीपुरवठा विभाग दोंडाईचा, कार्यक्रमाची उद्घाटक युतिका भामरे वैद्यकीय अधिकारी दोंडाईचा, दीप प्रज्वलन स्मितल गोस्वामी दंत आरोग्य तज्ञ, सकीना भारमल समन्वयक नियंत्रक हस्ती ग्रुप दोडाईचा, प्रमुख पाहुणे जयश्री सोमवंशी आर्किटेक्ट, आशा मन्सुरी ॲडवोकेट, सुरेखा काळे पोलीस कॉन्स्टेबल, हस्ती स्कूल क्रीडा प्रमुख जितेंद्र सुरवाडे, जळगाव शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव निलेश बाविस्कर, हॉकी संघटनेचे सचिव प्रशिक्षक दुर्गेश पवार, तलवारबाजी प्रशिक्षक विशाल पवार, शारीरिक शिक्षण शिक्षक योगेश पाटील, प्रा.भरत कोळी, बॉक्सिंग प्राशिक्षक पवन शिरसाठ, सर्व पंच प्रशिक्षक धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते राष्ट्रीय खेळाडू माहेश्वरी चोपडेचा सन्मान करण्यात आला. व...