धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५


धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५ 


महिला सशक्तीकरणाचा मंत्र – आत्मविश्वास, ताकद आणि जिद्द!
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाला चालना देण्यासाठी धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन आणि हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्च २०२५, रविवार रोजी ही स्पर्धा हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे.
धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे आणि उपाध्यक्ष कैलास जैन, सहसचिव लिंबाजी प्रताळे, खजिनदार जितेंद्र बोरसे, किशोर पाटील, योगेश पाटील यांनी महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
स्पर्धेच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये समाविष्ट: महिला बॉक्सिंगसाठी विशेष प्लॅटफॉर्म निर्माण करणे
महिला खेळाडूंच्या कौशल्यांना वाव देणे आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे
महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना सशक्त बनवणे
उत्कृष्ट खेळाडूंना विशेष प्रमाणपत्रे व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविणे
प्रमुख आयोजन समिती आणि मार्गदर्शक मंडळ:
अध्यक्ष: डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष: कैलास जैन, क्रीडा प्रमुख: जितेंद्र सुरवाडे, प्रकाश खंडेराव, विशाल पवार, बॉक्सिंग प्रशिक्षक: विजेंद्र जाधव, तांत्रिक अधिकारी: ऋषिकेश अहिरे, सचिव मयूर बोरसे 
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रमुख जितेंद्र सुरवाडे, प्रकाश खंडेराव, विशाल पवार, प्रशिक्षक विजेंद्र जाधव, निलेश धनगर, रोशनी पाटील आणि तांत्रिक अधिकारी ऋषिकेश अहिरे, सचिव मयूर बोरसे अहोरात्र मेहनत घेत आहेत.
स्पर्धेची तारीख व स्थळ:
९ मार्च २०२५, रविवार
 हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

"धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास म्हणजे संघर्षमय आणि प्रेरणादायी... "