जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा संपन्न
जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा संपन्न
हस्ती पब्लिक स्कूल क्रीडा संकुल दोंडाईचा येथे झालेल्या धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन, हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त भव्य बॉक्सिंग स्पर्धेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष वैशाली महाजन माजी सभापती पाणीपुरवठा विभाग दोंडाईचा, कार्यक्रमाची उद्घाटक युतिका भामरे वैद्यकीय अधिकारी दोंडाईचा, दीप प्रज्वलन स्मितल गोस्वामी दंत आरोग्य तज्ञ, सकीना भारमल समन्वयक नियंत्रक हस्ती ग्रुप दोडाईचा, प्रमुख पाहुणे जयश्री सोमवंशी आर्किटेक्ट, आशा मन्सुरी ॲडवोकेट, सुरेखा काळे पोलीस कॉन्स्टेबल, हस्ती स्कूल क्रीडा प्रमुख जितेंद्र सुरवाडे, जळगाव शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव निलेश बाविस्कर, हॉकी संघटनेचे सचिव प्रशिक्षक दुर्गेश पवार, तलवारबाजी प्रशिक्षक विशाल पवार, शारीरिक शिक्षण शिक्षक योगेश पाटील, प्रा.भरत कोळी, बॉक्सिंग प्राशिक्षक पवन शिरसाठ, सर्व पंच प्रशिक्षक धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
प्रमुख पाहुण्यांचे हस्ते राष्ट्रीय खेळाडू माहेश्वरी चोपडेचा सन्मान करण्यात आला.
विजेत्या बॉक्सिंग खेळाडूंना बक्षीस वितरण नंदुरबार जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. मयूर ठाकरे, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे, जळगाव शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव निलेश बाविस्कर, क्रीडा विभाग प्रमुख जितेंद्र सुरवाडे, प्रकाश खंडेराव, विशाल पवार सर्व बॉक्सिंग प्रशिक्षक पंच यांच्या हस्ते करण्यात आले.
धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे उपाध्यक्ष कैलास जैन, सहसचिव लिंबाजी प्रताळे, खजिनदार जितेंद्र बोरसे, किशोर पाटील, योगेश पाटील यांनी विजेत्या महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .
जागतिक महिला दिनानिमित्त बॉक्सिंग स्पर्धेत के.व्ही.पी.एस बॉक्सिंग क्लब शिरपूर, हस्ती बॉक्सिंग क्लब दोडाईचा, क्ले बॉक्सिंग क्लब भुसावळ , ब्लूस्टार बॉक्सिंग क्लब भुसावळ , NBFS क्लब जळगाव शहर,आबाजी स्पोर्ट्स नंदुरबार, धुळे बॉक्सिंग क्लब, छत्रपती बॉक्सिंग क्लब धुळे शहर यांनी सहभाग नोंदवत एकूण ११८ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे पंच म्हणून टेक्निकल डेलिकेट प्रा.भरत कोळी, पंच ऋषिकेश अहिरे, योगेश माळी, भूषण पवार, पुनम उठवाल अलिशा शेख, सुरज शिरसाठ, दीपक गिरासे दर्शन कोळी, नयन सोनवणे, रोहित सोनवणे यांनी काम पाहिले.
बॉक्सिंग स्पर्धेसाठी हस्ती स्कूलचे क्रीडा प्रमुख जितेंद्र सुरवाडे,प्रकाश खंडेराव,विशाल पवार बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव, निलेश धनगर, रोशनी पाटील, तांत्रिक अधिकारी ऋषिकेश अहिरे ओम राजपूत यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्राध्यापक भरत कोळी व आभार प्रदर्शन विशाल पवार यांनी केले.




















Comments
Post a Comment