किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त व शिरपूर नगरीचे नगरसेवक मा. रोहित बाबा रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा व सुवर्ण विजेतीचा सत्कार सोहळा

 




किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त व शिरपूर नगरीचे नगरसेवक मा. रोहित बाबा रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा व सुवर्ण विजेतीचा सत्कार सोहळा


किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त व शिरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक मा. रोहित बाबा रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धा व गौरव समारंभ या कार्यक्रमात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती पंखुडी बंटी सारसर हिचा संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. तुषारजी रंधे व मा. रोहित बाबा रंधे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.


पंखुडीने नुकत्याच जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते. तिच्या या यशामागे संस्थेचे क्रीडा शिक्षक व बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव सर,ओम राजपूत,महिला प्रशिक्षक पूनम उठवाल यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.


कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, क्रीडा विभागाचे प्रमुख, शिक्षकवृंद व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंखुडीच्या या यशाबद्दल उपस्थितांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५