Posts

Showing posts from November, 2025

धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे आणि नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे यांचा भव्य सत्कार

Image
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व धर्मदाय आयुक्त श्री. राहुल चव्हाण यांच्या देखरेखीखाली मुंबईतील वरळी येथे अत्यंत पारदर्शक, शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर नियमांनुसार पार पडल्याने बॉक्सिंग वर्तुळात पारदर्शकतेबद्दल समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणुकीत आमदार प्रविण दरेकर यांनी तब्बल ४३ मतांनी विजयी होत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्षपद पटकावले. त्यांच्या नेतृत्वावर राज्यभरातून व्यक्त झालेला विश्वास लक्षणीय ठरला. याच निवडणुकीत धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनीही ४३ मतांनी दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्षपद पटकावले. त्यांच्या विजयानं धुळे जिल्ह्याचा मान उंचावला असून त्यांच्या नेतृत्वगुणांची पुन्हा एकदा प्रभावी नोंद झाली आहे. धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे हे नाशिक विभागीय सचिवपदी बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या शांत, समन्वयक, नियोजनबद्ध कामकाजामुळे विभागात समाधानाची भावना निर्माण झाली आहे. या निवडणुकीत प्रामाणिकपणा, कष्ट, न...

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

Image
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मा. प्रवीण दरेकर साहेब आणि मा. जय कवळी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व २७ जागांवर विजयी होत ऐतिहासिक कामगिरी केली. संपूर्ण पॅनेलचा हा एकमताचा विजय महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्रीडा क्षेत्रातील विश्वास, संघटित बळ आणि पारदर्शकतेचे द्योतक ठरला आहे. या दणदणीत विजयानंतर विजयी उमेदवारांनी वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करून विशेष शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील क्रीडा विकासासाठी नव्याने निवडून आलेले पदाधिकारी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि खेळाडू-केंद्रित कार्य करतील, असा विश्वास मा. फडणवीस साहेबांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

Image
मुंबई : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक आज मुंबईत उत्साहात संपन्न झाली. या निवडणुकीत आमदार प्रविण दरेकर हे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले असून त्यांना तब्बल ४३ मते मिळाली. तर धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्षपदावर ४३ मते मिळवत आपला विजय नेतृत्व सिद्ध केले. धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे हे विभागीय सचिवपदी बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा वर्तुळात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. या निवडणुकीत प्रामाणिकपणा, कष्ट आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा यांचे वर्चस्व दिसून आले. स्पर्धा चुरशीची असली तरी अखेरीस संघटनात्मक एकतेचा आणि स्वच्छ कारभाराचा विजय झाला. राज्यभरातून आ. जय कवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला असून महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळ नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला आहे. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.