राज्याच्या शिक्षण विभागाचे सर्व शाळांना सूचना पालकांनी व विद्यार्थ्यांनी दाखला मागणी केल्यास शाळांना आता दाखला अडवता येणार नाही

🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊


*भरत कोळी*
*खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.*

*लेख-41*

*#राज्याच्या शिक्षण विभागाचे सर्व शाळांना सूचना पालकांनी व विद्यार्थ्यांनी दाखला मागणी केल्यास शाळांना आता दाखला अडवता येणार नाही#* 

 यावर एक नजर......... 

               *शिक्षणाचे व्यापारिकरण करणाऱ्या शाळेमधुन दाखला घ्या आणि आपल्या हक्काचं शिक्षण देणाऱ्या मराठी शाळेत प्रवेश घ्या*

📄📄📄 *हा दाखला आता* *मराठीतचं हवा*📄📄📄

*मराठी शाळेत पुन्हा प्रवेश*.........

     मागच्या दोन ते तीन वर्षपूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी महाराष्ट्रात *शिक्षणाचे व्यापारीकरण* करून सोडलं याला महाराष्ट्रातील अनेक पालक बळी पडले, आणि मराठी शाळांचा ऱ्हास होत गेला अस म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही हे सत्य परिस्थिती आहे....

         इंग्रजी भाषेच्या विरोधात मी कधीच नाही,या इंग्रजी भाषेमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळू शकले, इंग्रजी भाषेचा प्रसार व प्रचार झाल्यामुळेचं भारतीय प्रातांतील माणसं एकमेकांना भेटू शकली विचारांचे आदान-प्रदान होण्यासाठी इंग्रजी भाषा उत्तम सुवाहक ठरली, त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं इतर देशांच्या क्रांती चळवळींचा अभ्यास भारतीय क्रांतिकारक करू लागले यातून प्रेरणा भेटली.....मी इंग्रजी भाषेवर टीका करत नाही फक्त तिच्या नावाखाली जो शिक्षण व्यापारिकारणाचा धंदा लावला आहे,त्यामुळे मराठी माध्यम मागे पडत आहे,जरा विचार करा 1993-2007 या वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या किती मोठी होती,आणि त्या शाळेतील प्रवेशित विद्यार्थीची संख्याही खुप मोठी होती,तेव्हा शिक्षण व्यापारीकरण हा शब्द नव्हता मात्र 2011 वर्षांपासून ह्या शब्दांची व्याप्ती वाढत गेली. याला जवाबदार शासन का पालक हे अजून समजत नाही...2017 या वर्षापर्यंत इंग्रजी शाळांची संख्या इतकी वाढली की  शासनाला थेट *मराठी शाळा बंद* करण्याचा निर्णय घ्यावा लागतो,याला मराठी शाळांचे आजारपण म्हणावं की मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची संख्या कमी झालेली म्हणावं हे सांगणं जरा अवघड आहे पण खरंही तेवढेच, पालकांच्या मनात वेगळीच संकल्पना राबविण्यात येत आहे इंग्रजी शाळेतील मुलांनाच भविष्यात नोकरी मिळेल,असा वाजवा गाजवा करत अप्रत्यक्ष आनंद देऊन  पालकांकडून या आनंदाच्या नावाखाली पैसा लुबाडणूक सुरू आहे,मराठीत पोरगा शिकून काय करेल एक तर धंदा दुसरा कारकून असा हल्ला व प्रचार मराठी माध्यमाच्या शाळेच्या विषयी सुरू आहे,मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या व्यापाऱ्यांना सांगावं असं वाटतं आमच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुलं आज कलेक्टर, मंत्री, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी चांगल्या पदावर आजही आहेत मग हा भूतकाळ होतो का ? इंग्रजी माध्यमाच्या व्यापाऱ्यांनी वर्तमानकाळ व भविष्यकाळ सांगू नये,उलट जो तुम्ही शिक्षण व्यापारीकरण नावाचा धंदा सुरू केला आहे त्याला लवकरच आळा बसेल असं मला वाटतं.
       शिक्षणाच्या नावाखाली तुम्ही  पालकांची लूट व दिशाभूल करत आहात ते आता अनेक पालकांच्या लक्षात येऊ लागले आहे, शिक्षण व क्रीडा यातही तुम्ही *तळ* निर्माण केला आहे,व्यापारी तत्वज्ञान वापरत तुम्ही शाळेची शिस्त पाळत आहात यातही काही शंका नाही,तुमच्या रंगीत इमारत रंगेबिरंगे कपडे ,रंगीत पुस्तके यांच्या मोहाला आमचा पालक वर्ग बळी पडला काय प्रचार व प्रसार करता व्हा तुम्ही अश्या  धोरणामुळे अनेक पालक इंग्रजी शाळांना बळी पडले आणि पैशाचा दुष्काळ जाहीर पालक करू लागले,2013-2014 या वर्षांत अनेक पालकांनी जिल्हा परिषद व इतर मराठी शाळेतून आपल्या पाल्यांची नावे काढून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला पण पुढे काय परिस्थिती झाली हे लक्षात आले,इंग्रजी शाळांनी नोकरीचा व इंग्रजीचा विद्यार्थी हुशार हा मोह दाखवत पालकांना आपल्या जाळ्यात टाकलं पण विद्यार्थी कडूनच अपेक्षा भंग होऊ लागला.परिस्थिती अशी झाली की मुलांना मराठी भाषेत वाचता व नाव लिहता येत नव्हतं यावरून तुम्ही पुढचा कार्यक्रम समजू शकता,अगदी प्रवेश प्रकिया पासून ते प्रत्येक गोष्टीत पैशाचा कागद दाखवला जातो,इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रवेशाच्या वेळीच पालकांकडून 15 ते 20 हजार रुपयांची मागणी केली आणखी तर सिनिअर के.जी.ज्युनिअर के. जी. पहिली, दुसरी, पाचवी,आठवी या इंग्रजी वर्गासाठी वाढीव फी ची तरतूद,इंग्रजी शाळेत वेगवेगळ्या होणाऱ्या कार्यक्रमाची वेगळी पैशाची आकारणी, अनेक वह्या रंगीत पुस्तक घेण्यासाठी हुकूमशाही,शालेय खेळण्याच्या जीवनात *अतिशय उच्चशिक्षणाचा अभ्यास* आणि मानसिक ताण नावाच्या आमंत्रण ही इंग्रजी शाळा देत आहे ,इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा खेळ असा चालतो.
       ह्या इंग्रजी शाळांनी मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं,म्हणून पालकांच्या मनात जिल्हा परिषद व इतर मराठी शाळाविषयी असुरक्षिततेची वातावरण निर्माण करण्यात आले,शुल्लक गोष्टीसाठी मोठ्या पैशाच्या मागणी ह्या इंग्रजी शाळेकडून केला जातो,हे शिक्षण देतात की व्यापार करतात हे अजूनही कळत नाही.
    शासनानेही मोठी चूक केली,एक गल्ली सोडली की दुसऱ्या गल्लीत इंग्रजी शाळा पाहायला मिळते *खरं तर शिक्षण केंद्रीकृत नको वेकेंद्रीकृत हवं* पण ही संकल्पना मागे टाकून यांनी व्यापारिकरण शिक्षण निर्माण केलं.संपूर्ण घोड हा शासनाकडून झाला,इंग्रजी शाळा परवानगी देण्यात मागे पुढे मागे पाहिले नाही आणि सरळ अधिकार देत परवानगी दिल्या आणि मराठी शाळांना जाचक अटी देऊन मराठी शाळांना गळचेपी केली,मात्र आजही राज्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत इंग्रजी उत्तम प्रकारे शिकवले जात,उत्तम जडणघडण होते,आज खुप चांगला शिक्षक वर्ग जिल्हा परिषद शाळेत आहे,उजळणी पासून ते मैदानावर खेळण्यापर्यत सर्व गोष्टी ह्या शाळेत होतात, शालेय पोषणआहार ही मिळतो,पैशाची मागणी होत नाही कारण या शाळा शासनाच्या वतीने चालविल्या जातात,खुप उत्कृष्ट शिक्षण आहे,जवळजवळ सर्वच जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाल्या आहेत,शाळेच्या भिंतीवर रंगीत चित्राच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणले जात आहे.

*मराठवाडा सारख्या दुष्काळग्रस्त ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलं थेट इंग्रजी भाषेतून नाटक सादर करतात हे उत्तम उदाहरण आहे* इंग्रजीत भाषण, संभाषण, इतरांशी संवाद इंग्रजीत पत्रलेखन व इतर लेखन उत्तम इंग्रजी शैलीतअसतं, आमच्या *खान्देश* मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे,गणित सारख्या विषयाला अनेकांचा 36 चा आकडा असतो पण ह्या जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थीना खेळाच्या साहित्यातून गणित शिकवलं ही मुलं अगदी खेळत-खेळत गणित सोडवतात,महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण उत्तम आहे,इंग्रजी व गणित ह्या शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्तम असतं.
         *म्हणूनच आज पालकांचे डोळे उघडले आहे*

*शिक्षणमंत्र्यांनी मागच्या दोन वर्षांतील आकडेवारी अहवाल सादर केला त्यात इंग्रजी शाळेच्या माध्यमातून 25 हजार विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेकडे वळले आहेत,असं महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं* 

 मग तरीही का मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ? असा माझा प्रश्न माननीय मंत्री साहेबांना असेल.

     पण पालकांकडून परिवर्तन घडवून येत आहे,यामुळे मराठी शाळा बंद होणार नाही तर पुनर्जन्म होईल,यांचा वेगळा आनंद मिळतो मराठी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे......

 1 मे 2018 ला महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा झाला, याच दिवशी शालेय विद्यार्थ्यांचा निकाल लागला अनेक,आणि पालकांनाही पैशाची किंमत कळली असावी यातून अनेक *पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर बहिष्कार करत मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल पालकांचं माझ्याकडून व माझ्या उपक्रमात सहभागी झालेल्या ऋषिकेश अहिरे व माझे प्रशिक्षक यांच्याकडून हार्दिक अभिनंदन*

महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळाना सुचना देण्यात आल्या की विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा हा निर्णय त्यांचा व त्यांच्या पालकांचा आहे, यासाठी त्यांनी शाळेचा दाखला मागितल्यास त्यांना दाखला देणं शाळेला बंधनकारक आहे,अनेक शाळेकडून दाखला देण्यास टाळाटाळ केल्या जाण्याचा घटना समोर आल्या आहेत,शाळेतील पटसंख्या कमी होऊ नये हे कारण होते पण आता दाखला देण्यास नकार  शाळांना करता येणार नाही.........खुप चांगला निर्णय राज्याच्या  शिक्षण विभागाने घेतला आहे...


*महाराष्ट्र ला मराठी भाषेचा अभिमान आहे,आम्हाला आमच्या भाषेत शिक्षण हवं*!!

*आम्ही इंग्रजीचा फक्त आमच्या  विकासाठी उपयोग करू* !

*मराठी शाळेत फक्त मराठी नाही शिकवली जात*

 *शारीरिक शिक्षण,अर्थशास्त्र, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, समाजशास्त्र व इतर विषय शिकवले जातात*!

*शेवटी आज शिक्षणाचे व्यापारी हरले*

*आमच्या जिल्हा परिषद शाळेचा विजय झाला*☺☺

*आमच्या जिल्हा परिषदचा कलेक्टर आता तुमच्या इंग्रजी शाळेवर चौकशी करेल*

*आमच्या जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थ्यांचे नाटक एकदा पाहून बघा*

 *अखेर शिक्षण मंत्री मराठी शाळांना नमले*

*जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांचा पहिला मोठा विजय*

*आमच्या सारख्या अनेक जिल्हा परिषद माजी विद्यार्थ्यांना समाधान*   

जय हो क्रीडा क्षेत्र

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५