8 मार्च 2020 महिलादिनानिम्मित हार्दिक शुभेच्छा

🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊


*लेखन*
*भरत कोळी*
*खेळाडू ते........ हा प्रवास सुरू राहील.*

👧🏻👧🏻👧🏻👧🏻👧🏻👧🏻👧🏻

*#8 मार्च 2020 महिलादिनानिम्मित हार्दिक शुभेच्छा#💐💐💐*

⚽🥍🏉🏈🥊🏓🏸🥎🥌🏹🛷🎾🏀⚾🏊‍♀⛹‍♀🏋🏻‍♀🏆🥇🏇🏻🤺🤾‍♂🥊🤾‍♀🤼‍♂

*"चलो साथ मिलकर एक संकल्प 2020 मैं करते है,की मेरी देश की हर बेटी मैंदान की रणरागिनी हो,और हर बेटी इस देश की शान हो...,"*

*#चूल आणि मुल हेचं महिलांचे जीवन अशी मानसिकता ठेवणाऱ्या लोकांनी भारतासारख्या विकसनशील आणि समान न्याय हक्क मिळणाऱ्या देशात राहू नये...#*

8 मार्च 2020 रोजी होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐
   
            *6 वेळेस जगविजेती महिला बॉक्सर मेरी कॉम,2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सिल्वरपदक पटकावणारी पी.व्ही.सिंधू तर कांस्यपदक पटकवणारी कुस्तीपटू साक्षी मल्लिक,फुलराणी अशी ओळख असणाऱ्या सायना नेहवाल,अश्विनी पोन्नपा, आंतरराष्ट्रीय हिमा दास, कविता राऊत,माजी आंतरराष्ट्रीय धावपटू पी.टी उषा,अंजु बॉबी,माजी ऑलिम्पिक पदकविजेती कर्णम मल्लेशव्हरी,#कुस्तीपटू# गीता फोगाट, बबिता फोगाट, विणेश फोगाट,पूजा दांडा,#जिम्यस्टिक# दीपा करमारकर,#नेमबाज# मनू भाकर, #टेनिसपटू# सानिया मिर्झा,अंकिता रैना #क्रिकेटपटू# मिताली राज, हणप्रित कौर,स्मृती मानधना,झुलन गोस्वामी #हॉकीपटू#राणी रामपाल, नवज्योत कौर,वंदना,बॉक्सर एल.सरिता देवी,कविता चहल,पिंकी जांगरा,युवा बॉक्सर साक्षी चौधरी#आर्चरी# दीपिका कुमारी#टेबल टेनिस#नेहा अग्रवाल,मनिका बत्रा*
             
          *#अशा अनेक महिला खेळाडूंनी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्जवल केलं अशा या महान महिला खेळाडूंना आमच्या क्रीडा परिवाराकडून मानाचा मुजरा,मानाचा मुजरा.....#*

👧🏻 *8 मार्च जागतिक महिला दिवस*👧🏻 भारताबरोबरचं अनेक देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो,मिरवणूक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, पुरस्कार वितरण,व विविध सांस्कृतिक गाथा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला दिनाचा जागर 8 मार्च या दिवशी केला जात असतो,
               *जागतिक स्तरावर महिलांची कीर्ती ही सुर्या सारखी तेजस्वी आहे,सूर्य जसा सूर्यप्रकाश देत असतो,तशीचं ही माय-माऊली आपल्याला संस्कार देत असते,जगाच्या पाठीवर भारत असा देश आहे की आपल्या भूमीला आई मानतो आणि आई मानणाऱ्या देशात नारीचे स्थान काय असेल, खरं तर भारतीय नारी शक्ती इतर देशांच्या नारी शक्तीपेक्षा खुपचं वेगळी आहे,कारण भारतात प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत, सामाजिक,राजकीय,आर्थिक,शैक्षणिक,व्यावसायिक अशा सर्व ठिकाणी महिलांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे,कै.सुषमा स्वराज यांनी राजकारणातील चाणक्य अशी ओळख निर्माण केली,सावित्रीबाई फुले यांनी भारतासारख्या पुरोगामी विचारांच्या लोकांची मुलींच्या बाबतीत असलेली शिक्षणाविषयी मानसिकता बदलण्यासाठी अनेक कष्ट घेतले,राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांना झुकवण्यास भाग पाडले, अहिल्याबाई होळकर,ताराबाई सारख्या महिलांनी या भारत देशात महिलांचे अस्तिव निर्माण केलं.....भारतीय महिलांना प्रत्येक क्षेत्रात आपलं बलदंड स्थान निर्माण केलं आहे आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याचं स्वातंत्र्य आहे* त्याबरोबरचं भारतीय महिलांनी अनेक क्षेत्रात उंची गाठली आहे,त्यात राजकीय क्षेत्रात माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटिल,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारी,श्रीमती महाजन विदेशमंत्री कै.सुषमा स्वराज, मुख्यमंत्री वसुंधरा राजे अशा अनेक महिलांनी एक वेगळा ठसा उमटवला अगदी भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची जवाबदारी असलेले संरक्षणमंत्री हे पद सुध्दा एका *महिलेने* भूषविले हे भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे,भारताचे आर्थिकमंत्री पद निर्मला सीतारामन हे भूषवित आहे,तर आर्थिक क्षेत्रातही चंदा कोचर,अरुंधती रॉय सारख्या अनेक महिलांनी आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहेत,बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा बँक समूह असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्षपद ही एका महिलेने भूषवले आहे,भारताच्या सामाजिक क्षेत्रातही महिलांचे खुप योगदान आहे,याला संपूर्ण भारत साक्ष आहे, *"मासाहेब जिजाबाईंनी शिवाजी महाराजांवर जे संस्कार केले,त्या संस्कारांतून रयतेचे रक्षण करणारे स्वराज्य उभं राहू शकले होते"* भारत देशात  शैक्षणिक क्रांती घडवून आणणाऱ्या सावित्रीबाई फुले सारख्या अनेक महिलांनी विविध क्षेत्रात कार्य केले,या महान कार्यातूनचं भारतीय नारी चूल आणि मूल ह्या संस्कृती पासून मुक्त झाली,नारी शक्ती ही भारत मातेची शान आहे,अशा माझ्या नारी शक्तीला  8 मार्च 2020 या महिलादिनानिम्मित हार्दिक शुभेच्छा..........💐💐 
पूर्ण जगात भारताचं एक वेगळं स्थान आहे,त्याला कारण म्हणजे *नारी शक्ती,देशाची प्रगती* यामुळेचं भारताचं संपुर्ण विश्वात वेगळं स्थान निर्माण झाले आहे.....
                 *पण तरीही भारतात काही गोष्टींमध्ये पाहिजे तसं स्वातंत्र्य महिलांना मिळाले नाही,त्यात खास करून क्रीडा क्षेत्रात ही परिस्थिती लक्षात येते,ज्यादिवशी पूर्ण भारतात 100 पुरूष खेळाडू मागे 100 महिला खेळाडू......* हे प्रमाण ज्यादिवशी बरोबरीत येईल त्यादिवशी खरा महिलादिवस साजरा होईल असं मला वैयक्तिक मतानुसार वाटतं...
          खरं तर आई,बहीण आणि बायको ह्या पलीकडे ही महिलांचं अस्तित्व असतं... असं कोणाला वाटतं..?
*चूल आणि मूल ही संकल्पना फार दिवसापूर्वीच बदलली...पण तरीही काही लोकांना हीच संकल्पना योग्य वाटते पण मी ह्या लोकांना सांगू इच्छितो की त्यांनी ह्या संकल्पनेपलीकडे विचार करावा.?*
             मागच्या वर्षीच्या महिलादिनानिम्मित मी लेख प्रसिद्ध केला होता,त्यात आपण *2011 भारताची जनगणना विषयी माहिती घेतली होती.* या लेखात आपण 2011 ची  लिंगगुणोत्तराची आकडेवारी पाहू,भारताचे लिंगगुणोत्तर -एकूण 1000 पुरुषांच्या मागे 943 आहे तर हेच प्रमाण *महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे 929* ते *थेट हरियाणा मध्ये हेच प्रमाण 879* ,पंजाब 895 आहे हे भारतीय लिंगगुणोत्तर आहे. हे भारतातील विविध राज्यात लिंगगुणोत्तर फार वेगवेगळ्या प्रमाणात आहे,फक्त केरळ मध्ये हे प्रमाण बरोबरीने दिसते.फार विषमता भारतीय राज्यात व केंद्रशासित प्रदेशात आढळते, *मी या लेखात फक्त "क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने" स्त्रीलिंगगुणोत्तराचा विचार केला आहे.*
          *2016 च्या रिओ ऑलिम्पिकच्या क्रीडा स्पर्धेमध्ये दोन महिला खेळाडूंनी भारताला पदक मिळवून दिली हे कधीच विसरता येणार नाही* जे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं हे प्रत्यक्ष स्थिती रिओ ऑलिम्पिक मध्ये संपूर्ण भारताला पाहता आली.
             काळानुसार जग बदलतं पण अजूनही काळानुसार लोकांची विचारसरणी बदलते पण मला कधीच असं वाटलं नाही की लोकांची विचारसरणी बदलली अजूनही तिचं आहे की *चूल आणि मूल हे फक्त महिलासाठीचं आहे* असा विचारच डोक्यात आहे,खरं तर एक प्रश्न कायमचं माझ्या डोक्यात  घर करून बसला आहे की काळ बदलला पण महिलांविषयी दृष्टीकोन अजूनही का  बदलला नाही...? हा प्रश्न आहे,याचं उत्तर भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला,या प्रश्नाबद्दल खूप वेगवेगळी उत्तर मिळाली त्याच कारण म्हणजे भारत हा लोकशाही विचारसरणीचा देश  म्हणून प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे,या कारणामुळे एकमत होऊ शकलं नाही... पण असो शिक्षित वर्गाने समाधानकारक उत्तर दिली,8 मार्च हा जागतिक महिला दिन अनेक ठिकाणी साजरा केला जातो,यादिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात,महिला दिना व्याख्यान आयोजित केली जातात व महिला विषयी आदर व्यक्त होतो, त्यादिवशी अनेक प्रसिद्ध महिलाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येतो,मग नंतर काय? असाही प्रश्न आहे,खरं तर महिला दिन हा रोजचं विचारातून साजरा झाला पाहिजे नुसतं एक दिवस महिला दिन साजरा करून काही होत नाही.लोकशाहीत सर्वांना समान संधी उपलब्ध आहे तरी आजही संसदेत 33% आरक्षण आजही प्रलंबित आहे का हे अजुनमान्य झाले नाही,याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, *महाराष्ट्र राज्यात 50%आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेवर दिलं गेलं खरं पण हे नामशून्य दिसतं.* एक हाती सत्ता हवी महिलाकडे,एकीकडे सरकार दरबारी *"नारी शक्ती,बेटी बचाओ बेटी पटावो"* असे भरपूर उपक्रम सुरू करतात त्यापैकी फक्त पण 30 ते 40%पूर्तता होते मग पूर्ण 100% का पूर्तता होत नाही असाही मोठा प्रश्न आहे,मी या लेखात राजकारणात प्रवेश करत नाही पण क्रीडा क्षेत्राच्या दुष्टीकोणाने हा लेख खुप महत्वाचा भाग मला वाटतो कारण हा विषय फक्त महिलांचा नाही तर येणाऱ्या भावी पिढीचा आहे.....देशात महिलांना स्वातंत्र्य हे प्रत्येक गोष्टीत हवं मग ते राजकीय,सामाजिक,आर्थिक, धार्मिक किंवा क्रीडा क्षेत्र असो तिला स्वतःचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार हवाचं असं एक वाक्य आहे की *एक स्त्री शिक्षित झाली तर घरातील संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं..* खरं तर ह्या वाक्यात 100 % सत्यता आढळून येते....
        *(क्रीडा क्षेत्र)* हरियाणात महिला लिंगगुणोत्तर 879 आहे,ही फार गंभीर परिस्थिती ह्या राज्यात असली तरी *क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने हरियाणात फार चांगली परिस्थिती महिलांच्या बाबतीत समाधानकारक आहे या राज्यात आहे.* 2013 पर्यंत  "क्रीडा क्षेत्र हे पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून ओळखलं जात होत पण सामाजिक विचारसरणीत थोडाफार बदल झाल्यामुळे क्रीडा क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढू लागले,2014 मध्ये क्रीडा क्षेत्र हे पुरूषप्रधान आहे.असा वाजा अलीकडे वाजविला जात होता पण हरियाणात हा वाजा  वाजू दिलाच नाही! कारण क्रीडा क्षेत्रात मुलां बरोबरच मुलींना समान प्रमाणात संधी दिली गेली,उत्तरेकडील हरियाणा,पंजाब राज्यात महिला खेळाडूंचे लिंगगुणोत्तर सकारात्मक दिसते पण महाराष्ट्र राज्याचे काय ? असा प्रश्न आहे हे चित्र काही प्रमाणात बदलतं झालं असलंं तरी पण गतिशील प्रमाण अधिक हवं.गोल्ड कोस्टच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत व आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून महिला खेळाडूंचा दबदबा दिसून आला होता.
                  2016 च्या रिओ ऑलिम्पिकच्या क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने जी पदके मिळवली ती महिलांनीच मिळवून दिली हे कोणीही विसरू शकत नाही,भारताच्या क्रीडा इतिहासात महिलांचे अनमोल असं योगदान आहे,म्हणून जे क्रीडासन्मान,पुरस्कार,ज्या क्रीडा सुविधा पुरुषांना उपलब्ध होतात तशाच क्रीडा सुविधा महिला खेळाडूंना उपलब्ध व्हाव्या जेणेकरून *क्रीडा क्षेत्र हे समान क्रीडा क्षेत्र व्हावं* भारताने अनेक क्रीडा सुवर्णकन्या आज पर्यंत दिल्या,त्याचबरोबर भारतीय महिलांनी आपल्या देशाचे नाव जगभरात लौकिक केलं आहे,क्रीडा क्षेत्रात तर महिला खेळाडूंनी वेगळाच ठसा उमटवला आहे,अनेक महान खेळाडू झाले तर इतर देशाच्या संघाचे प्रशिक्षक झाले विविध क्रीडा संघटनेवर पदाधिकारी म्हणून सुध्दा आज महिला कार्यरत आहे, मागच्या वर्षीच "भारतीय खेल प्राधिकरण" च्या महासंचालकपदी  नीलम कपूर यांची नियुक्ती करण्यात आली होती अभिमानास्पद गोष्ट ठरली, नक्कीच महिलांना सन्मान दिला जातोय हे निश्चितचं पण ही संख्या पुरुषांच्या बरोबरीने नाही हे सुध्दा स्पष्ट असं चित्र दिसतं,अजूनही क्रीडा क्षेत्रात महिलांना योग्य व्यासपीठ मिळत नाही,याची खंत सतत जाणवत असते,पुरूष क्रिकेटचे सामने थेट टी.व्ही.वर  दाखवले जातात मग महिलांचे क्रिकेट सामने का म्हणून दाखवले जात नाही यात सुध्दा तफावत दिसून येते हा प्रश्न सतत मन विचलित करत राहतो,असे अनेक गोष्टींना महिला खेळाडूंना सामोरे जावं लागतं,त्याचबरोबर महिला खेळाडूंना इतर अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं काही वेळेस तर फक्त पुरुषी क्रीडा स्पर्धा होतात तर पुरुषांच्या मानाने महिला क्रीडा स्पर्धा फार कमी प्रमाणात आयोजित करण्यात येतात,त्यामुळे महिला खेळाडूंना अधिक संधी मिळत नाही...
                या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुलींना मैदानावर पाठवण्यासाठी सकारात्मक नसतात तर काही पालक मुलींना घरच्या बाहेर पडू दिलं जात नाही किंवा क्रीडा स्पर्धा खेळू दिलं जात नाही,कारण त्यांना अजूनही असं वाटत असावं की चूल आणि मूल हेच यांचं भविष्य आहे हे समजून त्यांना का खेळू देत नाही ? अश्या अनेक समस्याना मुलींना तोंड द्यावे लागतं *संपूर्ण विश्वात नारी शक्तीचा जागर झाला पाहिजे.* आपल्या देशात अनेक पालकांनाचा असा गैरसमज आहे की मुलगाच आपल्या वंशाचा दिवा आहे अहो मुलगीही वंशाचा दिवा असते पण हे सिद्ध करण्यासाठी तिला थोडं स्वतंत्र पालकांनी द्यावी असं मला वाटतं.
महाराष्ट्र राज्याच्या परिवहन  बसवर ही हिरकणी नावाची बस सुरू केली आहे,विविध योजना राज्य सरकारने महिला सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केल्या पण याचा फायदा कितपर्यत झाला याची स्पष्टता करता येणार नाही,पण एवढ मात्र सांगता येईल की महिला सक्षमीकरण करण्यासाठी ही पाऊले योग्य आहे,पण अजूनही समाजाची विचारसरणी बदलण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतला पाहिजे.....

 *संपूर्ण जगभरात 8 मार्च जागतिक महिला दिवसानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले,जातात पण आपण ह्या 2020 ह्या वर्षी थोडा वेगळ संकल्प घेऊ*

          भारतातील प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची संख्या *"100 पुरूष खेळाडू मागे 100 महिला खेळाडू"* हा संकल्प हाती घेऊ ........आणि     पुरुषप्रधान क्रीडा क्षेत्र बदलून समान लिंगगुणोत्तर क्रीडा क्षेत्र बनवू हाच खरा सन्मान या 2020 च्या महिला दिनानिमित्त होईल असं मला वाटतं.....💐💐💐

 *"आज़ादी तो देश को 1947 मिल गई फिर अभी तक मेरी देश की बेटी को आज़ादी नही मिली"*

    *नारी शक्ती देशाची प्रगती*
 या मिळून करूया संकल्प पूर्ण..

 *"चलो एक संकल्प इस साल करे क्रीड़ा क्षेत्र मैं हर बेटी मैदान की झाशी हो"*

*बेटी पढ़ावो,बेटी बचाओ!!!*
     *हर घर का दिया सिर्फ बेटा नही होता बेटी भी उस घर की तेजस्वी किरण है!*


*#खास मुलींसाठी सुरू केलेली गो-गर्ल्स-गो या उपक्रमाच्या माध्यमातून 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांकडून पदकांची संख्या 2016 च्या रिओ ऑलिम्पिकपेक्षा जास्त राहील.#*

 👧🏻👧🏻

*#पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाला हार्दिक शुभेच्छा....💐💐💐#*



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

"धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास म्हणजे संघर्षमय आणि प्रेरणादायी... "