*#धन्यवाद सर#*
धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना,सारथी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या लॉकडाऊन क्रीडा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गात दिनांक 8 मे रोजी *जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजयजी सबनीस सर* यांनी जिल्ह्यातील तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्व प्रशिक्षक, मार्गदर्शक, पंच,शारीरिक शिक्षण शिक्षक,खेळाडू व क्रीडाप्रेमी यांना मोलाचे मार्गदर्शन केले व या ऑनलाईन क्रीडा शिबिराला शुभेच्छा दिल्या,त्याचबरोबर, *भारतीय खो-खो संघाचे उपकर्णधार तथा महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण महासंघाचे उपाध्यक्ष श्री. आनंद पवार सर* यांनी खो-खो खेळाबद्दल खुप छान माहिती सांगितली,त्यात नियम,वयोगट,मैदानाचे मापे तसेच सराव याबाबतीत त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं खरं तर आज सर्वत्र क्रीडा मैदान,क्लब,जिम बंद आहेत,त्यातचं खेळाडुंचा सराव कसा घ्यायचा हा मोठा प्रश्न समोर आहे,पण सध्या ऑनलाईन प्रशिक्षण मार्गदर्शनामुळे थोड्या-फार प्रमाणात का होईना खेळाडूंना मार्गदर्शन व क्रीडा क्षेत्रातील लोकांशी आज संवाद होत आहे,विविध खेळांचा इतिहास, सोई-सुविधा,नियम,प्रशिक्षण,पंच,स्पर्धा याबाबत चर्चा होत आहे,श्री.पवार सरांनी मोलाचं मार्गदर्शन केल्यामुळे खो-खो विषयी अधिक माहिती मिळाली त्याबद्दल सरांचे धन्यवाद
त्याचबरोबर आज दिनांक 9 मे दुपारी 1 वाजता *आबाजी स्पोर्ट्सचे (नंदुरबार) संचालक तथा क्रीडा संचालक प्रा.डॉ. मयुर ठाकरे सर* यांचे "क्रीडा विकासाचा आधुनिक दृष्टीकोन" याविषयावर त्यांनी आज लाईव्ह चर्चा केली खरं तर क्रीडा विषयी लाईव्ह संवाद ही एक आधुनिक क्रीडा विकास माझ्यामते म्हणता येईल,खरंच आज डॉ.मयुर ठाकरे सर यांनी खूप सुंदर दृष्टीकोन मांडले त्यात क्लब संस्कृती जिल्ह्यात वाढवली गेली पाहिजे,मनोरंजनात्मक खेळ हे खेळाडूला मैदानाकडे आकर्षित करण्यास मदत करतात, त्याचबरोबर पालकांशी चर्चा संवाद, प्रशिक्षक खेळाडू यामधील संवाद, संघटकांमध्ये समनव्य टिकवण्यासाठी घेतलेली भूमिका,पालकांचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा अनेक गोष्टीवर डॉ.मयुर सरांनी आपल्या संवादाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचविल्या त्याबाबत मी सरांचे खूप-खुप आभारी...
त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी व आबाजी स्पोर्ट्स नंदुरबार यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गात दुपारी 3 ते 4 दरम्यान या वेळेत *शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक पुरस्कार विजेते तथा शारीरिक शिक्षण क्रीडाशिक्षक श्री. संजयजी होळकर सर* यांनीही क्रीडा संघटना स्थापना,क्रीडा संघटनांचा उद्देश व शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षकांची भूमिका,क्रीडा संघटक,पुरस्कारा विषयी खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी सरांचे आभारी आहे....
*कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पै. गणेशराव मानगुडे सर* हे ही फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आजी-माजी पैलवान वस्ताद,प्रशिक्षक यांचा संवाद देशभर सुरू आहे...सरांचे ही मनापासून अभिनंदन
खरं ह्या लॉकडाऊन च्या काळात *खेळाडूचा फिटनेस कसा राखून ठेवता येईल किंवा वाढवता येईल ही सध्या परिस्थितीत तारेवरची कसरत प्रशिक्षक,मार्गदर्शक व शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षकांवर आहे.*
पण अशा परिस्थितीमध्येही आज क्रीडा क्षेत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्य करत आहे, मग ते प्रशिक्षण असो किंवा खेळांबद्दल माहिती असो आज हे कार्य सुरू आहे,ह्या महान कार्यात सहभागी असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा......
आपलाच
*भरत कोळी*
*खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहील.*
🙏🙏🙏
*जय हो क्रीडा क्षेत्र*
🥊🏆
धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना,सारथी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या लॉकडाऊन क्रीडा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गात आज भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक AIBA 2 स्टार तथा माजी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सुभेदार जयसिंग पाटिल सर यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन करत खेळाडूंची मने जिंकली हे आमच्या व्हाट्सएपवर येणाऱ्या संदेशामुळे समजतंय.... खरं तर सुभेदार जयसिंग पाटिल सरांचा प्रवास अतिशय खडतर आहे,संघर्षाने भरलेल्या वाटा होत्या पण त्या वाटेवरून मार्ग काढत आज भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक म्हणून सर यशस्वी भूमिका बजावत आहेत,
सरांनी आपल्या अमूल्य मार्गदर्शनात खेळाडूंना मोलाचा संदेश दिला तो म्हणजे "ध्येय गाठण्यासाठी तुम्ही काही गोष्टीचा त्याग करा" जिल्हास्तराला ही तुम्ही मोठी आहे} स्पर्धा समजून ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत मजल गाठा,राज्य पदक राष्ट्रीय, पदक,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व व इतर काही पुरस्कार मिळाल्यामुळे तुम्ही थांबू नका,एक ध्येय साध्य करा... त्याबरोबर पालकांनी मुलींना कमी लेखू नका,पालकांनी प्रशिक्षणाबद्दल गैरसमज करू नका,महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळाडूंबद्दल सरांनी खूप छान माहिती सांगितली,त्याबरोबर भारतीय बॉक्सिंग संघातील खेळाडुंचा सरावाबाबत संवाद केला....सरांचे मार्गदर्शन अमूल्य होते, आणि नक्कीच प्रेरणा देणारं होतं....
आपलाच
*भरत कोळी*
*खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहील.*
🙏🙏🙏
*जय हो क्रीडा क्षेत्र*
🥊🏆



Comments
Post a Comment