लेख-217_शालेय शिक्षण व्यवस्थेत मार्कांची स्पर्धा नको कारण मार्क विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवू शकतं नाही...
*लेख-217*
*भरत कोळी*
*(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*
🥊⚽🥊🎽🥍🏓🏆🤺🤺🏆🥇🥈🥉🤼♂️🏒⛸️🥅🏹🎽
*"शालेय शिक्षण व्यवस्थेत मार्कांची स्पर्धा नको कारण मार्क विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवू शकतं नाही... "*
*📕📔+⚽🥊=यशस्वी समन्वय*
नुकताच बारावीचा निकाल लागला आणि निकालासोबतचं मला एका गोष्टींचा खुप आनंद झाला ती म्हणजे बारावीच्या निकालात *"शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधत खेळाडूंनीही स्वतःला सिध्द केलं की नाण्याचा दोन्ही बाजू सक्षम असाव्या कारण एक जरी बाजू कमकुवत असली तरी निश्चित केलेलं उद्दिष्ट साध्य होत नाही."* हे सत्य मान्य करायला हरकत नाही असो बारावीच्या परीक्षेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन💐💐💐💐
खंत फक्त एका गोष्टीची सतत वाटते ती म्हणजे विद्यार्थ्यांच्यादुष्टीने अनुभवता येईल असं शिक्षण आणि आनंदीत,तणावमुक्त असं शिक्षण नाही कारण जे शिक्षण मुलांच्या *"शारीरिक,मानिसक,बौध्दिक"* क्षमतेचा विकास करू शकत नसेल तर ते शिक्षण फक्त मार्कांची फुगवलेली आकडेवारी म्हटलं तर माझ्यामते वावगं ठरणार नाही.
शालेय स्तरावर शिक्षण मजबूत असणं अतिशय महत्वाचं आहे,कारण उद्या देशाचं भविष्य या शालेय विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे,हे नक्कीच पण जोपर्यंत ह्या शालेय स्तरावर *ताणतणावमुक्त* शिक्षण पद्धती अंमलात येत नाही तोपर्यंत ही शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांचं भविष्य कसं आहे हे ठरवू शकणार नाही,कारण अलीकडे *दप्तराचं ओझं* वाढल्यामुळे साहजिकचं विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढला,क्लासेसची शाळा ही बाजारात भरू लागल्या,पालकांचाही मुलांवर अभ्यास कर असा दाब वाढू लागला,मैदानावर जाऊ नको,खेळू नको,घरीचं रहा अशा सूचना घरच्या मंडळींनी सुरू केल्या, अभ्यासाबरोबरचं मार्कांची स्पर्धा शाळा-शाळामध्ये सुरू झाली आणि या स्पर्धेत विद्यार्थ्यांना प्रमुख भूमिका बजावण्यासाठी सज्ज सेना तयार केली आणि युद्ध मार्कांचं सुरू झालं....अशा ह्या युद्धाच्या नादात मुलाचं भविष्य केव्हा ताणतणावाच्या खाली जात राहिलं हे कधीचं कोणाला समजलं नाही... आणि आज या कारणांमुळेचं मुलांच्या मानसिक ताणतणावाच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागल्या,आरोग्याच्या समस्या इतक्या लहान वयात सुरु झाल्या की पुढचं भविष्य कसं राहील या शालेय स्तरावरच्या मुलाचं हे सांगणं अवघड झालं..... म्हणून *"मानसिक तज्ज्ञांनी,मुलांच्या बाबतीत संशोधन करणाऱ्या मोठ्या अभ्यासकांनी मुलांच्या दुष्टीने तणावमुक्त शिक्षण हवं हे स्पष्ट केलं आहे"*
गणित हा विषय आयुष्याचं गणित सोडवतो, विज्ञान हा विषय मनात सुरू असलेल्या प्रयोगांना दिशा देतो,भूगोल हा विषय नैसर्गिक सानिध्यात आपलं आयुष्य कसं जगायचं हे शिकवतो, इतिहास हा विषय मानवाचं अस्तित्व सांगतं आणि महान विचारांची ऊर्जाशक्ती प्रेरित करतो,भाषा(मराठी, हिंदी, इंग्रजी) विषय हे संस्कृती/सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी व जगणं सोपं होण्यासाठी मदत करतात,चित्रकला,नागरिक,समाजशास्त्र,हे विषय ही खूप काही शिकवतात, आणि शारीरिक शिक्षण हा विषय तणावमुक्त वातावरणात,मुलांना आनंदीत श्वास देत शारीरिक व मानसिक क्षमता विकसित करत सुदृढ नागरिक म्हणून तयार करणारा विषय हा सध्या स्थितीत शालेय स्तरावर महत्त्वाचा वाटतो,कारण शारीरिक शिक्षण ह्या विषयांचा सर्व विषयांशी अगदी जवळचा संबंध येतो,गणित, विज्ञान,भूगोल,इतिहास हे विषय मुलांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेला चालना देतील अशा पध्दतीने शिकवता येतील आणि ताणतणावमुक्त वातावरणात मुलं आनंदीत राहतं मुलं स्वतःचं भविष्य स्वतः निर्माण करू शकतील अशी ताकद ह्या शालेय शिक्षण व्यवस्थेत असणं अतिशय महत्त्वाचं आहे.... नुसतं मार्कांची आकडेवारी मुलाचं भविष्य ठरवू शकणार नाही.
-मुलांच्या बुध्दीमत्तेला वाव मिळेल असं शिक्षण मुलांना कोणताही निर्णय घेतांना अडथळा निर्माण होणार नाही असं शिक्षण हवं....
-मुलांच्या आनंदात ते शिक्षण महत्वाचा घटक बनू शकेल आणि मुलाचं भविष्य ठरवू शकेल अशी शिक्षण प्रक्रिया हवी. -मुलांची कौशल्य काय आहेत हे ओळखता येईल असं शिक्षण भारताला महासत्ता बनवू शकेल.
-शारीरिक व मानिसक बलशाली आणि सक्षम होऊ शकेल असं शिक्षण सुदृढ नागरिक तयार करू शकेल.
-अनुभव घेता येईल असं शिक्षण असावं.
*"शालेय शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण हा विषय" पायाभूत सुविधासह 100% मजबूत असणं गरजेचा आहे...."*
*"शारीरिक शिक्षण म्हणजे खेळ नाही तर मुलांचा सर्वांगीण विकास साधणारा विषय आहे....."*
*"नाण्याची एक बाजू शारीरिक शिक्षण आणि नाण्याची दुसरी बाजू क्रीडा...पहिली बाजू मजबूत असेल तरचं क्रीडा हा यशस्वी होऊ शकतो..."*

Very interesting 😍👍👍👍👏👏👏👍👍👍😊🌺
ReplyDelete