लेख-218 _ हिरो घडवण्यासाठी बादशहाला त्याचं अस्तित्व हवं....नाहीतर हिरो फक्त चित्रपटातचं दिसेल.




*लेख-218*
*लेखन*
*भरत कोळी*
*(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*
*"हिरो घडवण्यासाठी बादशहाला त्याचं अस्तित्व हवं....नाहीतर हिरो फक्त चित्रपटातचं दिसेल."*
😔😔😔😔😔😔
*#लक्षात घ्या.👇👇👇"*
*आणि दोन्हीमधला फरक समजा..🥊🙏⚽🥈🥉🏆🪀🥇🥎🏏🪀🏈🎽🤼‍♀️⛹🏻‍♂️*
शालेय स्तरावर फक्त क्रीडा राबवणं म्हणजे वर्गातील 60 विद्यार्थ्यांमधील 10 विद्यार्थ्यांना सुदृढ आणि खेळाडू बनवणं असं होतं मग राहिलेल्या 50 विद्यार्थ्यांचे काय......????
*आणि*
शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण
राबवणं म्हणजे वर्गातील 60 विद्यार्थ्यांमधील 60 ही विद्यार्थी शारीरिक व मानसिक सुदृढ असतात आणि ही मुलं कोणत्याना- कोणत्या खेळात सहभाग घेत सक्रिय राहतात आणि आयुष्यभर निरव्यसनी,बलशाली व निरोगी जीवन जगतील....👍👍
            *"शालेय स्तरावर क्रीडा मजबुत करण्यापेक्षा शारीरिक शिक्षण हा विषय मजबूत केला तर मुलांच्या सर्वांगीण विकासासोबत ऑलिम्पिक मध्ये पदकांची संख्या आपो-आप वाढेल खेळाडुंचा ही दर्जा वाढेल...."* पण मुळातचं आपल्या शिक्षण व्यवस्थेत असं झालं आहे की ज्या वयात मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्या वयातचं मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही, आणि त्यामुळे ऑलिम्पिक सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेत आपले खेळाडू अपयशी होतात,हे अगदी सत्य आहे,ज्यांना कोणाला या विधानवर आक्षेप असेल तर त्यांनीचं सत्य सांगावं असं मला वाटतं,नुकतंच केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण जाहीर केलं,आणि त्यात क्रीडा अभ्यासक्रमाचा भाग असेल असं त्यात म्हटलं आहे,ही बाब जरी अभिमानास्पद व गौरवास्पद असली तरी हे येणाऱ्या भविष्याबाबत नक्कीचं प्रश्न चिन्ह निर्माण करत आहे...म्हणून *"ऑलिम्पिकच्या दुष्टीने आणि सुदृढ भारत निर्माण" करण्याच्या दुष्टीने शालेय शिक्षण व्यवस्थेत नेमकं क्रीडा ची गरज होती की शारीरिक शिक्षणाची गरज होती...?* हे धोरण तयार करतांना लक्षात घेण्याची गरज होती,असं मला वाटतं,विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या दुष्टीने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण खुप छान आहे,पण ऑलिम्पिकच्या दुष्टीने व सुदृढ समाज निर्मितीच्या दुष्टीने  *"क्रीडा की शारीरिक शिक्षण"* असाचं दुर्लक्ष पुन्हा माझ्या शाळेतला विद्यार्थी फसणार आहे....😇😇😇😇
               खरं तर शालेय स्तरावर शारीरिक शिक्षणाच्या तासिकेतून विद्यार्थ्यांच्या *"मूलभूत हालचालींचा व मूलभूत कारक कौशल्याचा विकास"* होतो हे विसरून चालणार नाही,तर ह्या दोन्ही गोष्टींचा विकास शालेय स्तरावर झाला तर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदकांची संख्या ही पटीने  वाढेल,या दोन्ही गोष्टींचा विकास शालेय स्तरावर झाला नाहीतर पुन्हा 2016 मध्ये रिओ(ब्राझील) येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत मिळालेली 2 पदके ही एक-दोन संख्येने वाढत  2021 मध्ये टोकियो(जपान) च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत फक्त 5 ते 6 पदकांवर समाधान मानावं लागेल....म्हणून *"चहामध्ये साखर टाकायची की तिखट टाकायचं हे जर समजत नसेल तर नेमकं धोरण आणि खर्च  कोणासाठी मग"* हा मोठा प्रश्न आहे,शालेय स्तरावर क्रीडा अभ्यासक्रमाचा भाग जर झाला तर वर्गातील सर्व विद्यार्थी यात सहभागी होतील का...? याचं उत्तर स्पष्ट द्यावं, माननीय क्रीडामंत्री महोदय व शालेय शिक्षण व्यवस्थेत क्रीडा अभ्यासक्रमाचा भाग बनविनाऱ्या तज्ञ व्यक्तींना माझा एक प्रश्न आहे.... क्रीडा मध्ये वर्गातील किती मुलं शारीरिक व मानसिक सुदृढ राहतील याचा आलेख सोशल मीडिया किंवा राजपत्रात द्यावा ही विनंती....🙏🙏
*"महोदय साहेब मी एक खेळाडू आहे,म्हणून सांगतोय मी यशस्वी खेळाडू नाही होऊ शकलो,कारण  माझ्या शाळेत शारीरिक शिक्षण हा विषय मजबूत नव्हता,आमचा शारीरिक शिक्षण शिक्षक कोण होते,त्याचं नाव आम्हाला माहीत नव्हतं,आमचा PE च्या तासाला अनेक जण PT त्यावेळी म्हणतं होते आणि वेळापत्रकातील आमचा PE चा तास कोण चोरून घ्यायचे याचा तपास लागलाचं नाही ...म्हणून माझी विनंती आहे की शारीरिक शिक्षण मजबूत करा आणि यशस्वी खेळाडू तयार होऊ द्या..."*
शालेय स्तरावर क्रीडा फक्त काही सिलेक्ट विद्यार्थ्यांसाठीचं(खेळाडू) राबवलं जाईल मग बाकीच्यांचं काय......? खरं तर वयाच्या 10 व्या 11 व्या वर्षांपासून खेळाच्या सरावाला  गती मिळत जाते,पण 10 वर्षं पूर्ण होण्याच्या अगोदर मूलभूत हालचालींचा विकास आणि मूलभूत कौशल्याचा विकास हा जर 60 % ते 65 % हा झाला असेल तर 10 ते 16 वर्षे पर्यंत 90 %  ते 95 % विकास होतो आणि 16 ते 18 वर्षांत 95% ते 100% पर्यंत मूलभूत हालचाली व कौशल्याचा विकास हा साधला जाऊन   राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय, राष्ट्रकुल, आशियाई व ऑलिम्पिक सारख्या क्रीडा स्पर्धेत पदक वाढतात,गुणवत्ता वाढते आणि देशाची शारीरिक व मानसिक शक्ती समोर येत सुदृढ महासत्ता बलशाली होते,हे जर लक्षात येत असेल तर *"शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण मजबूत करा,आणि क्रीडा प्रशिक्षण केंद्रात,क्लब, SAI(भारतीय खेल प्राधिकरण),सराव शिबीरात अशा ठिकाणी क्रीडा मजबूत करा..."*
नाहीतर पुरणपोळीचं जेवण बनवण्यासाठी कच्च्या आब्यांमधून रस काढता येत नाही तर पिकलेला(रसासाठी तयार झालेला) आंबा लागतो....☺️☺️☺️
*"हिरो चित्रपटातले नव्हे तर मैदानावरचे हिरो हवेत,म्हणून बादशहाला त्याच अस्तित्व हवं"👍👍👍👍*
*म्हणून कुठल्या स्तरावर काय नेमकं हवं याचा विचार करावा नाहीतर स्वप्न फक्त 2024 या वर्षांपर्यंत यशस्वी होतील आणि 2028 मध्ये पुन्हा एकदा नविन काहीतरी समस्या लक्षात येईल....*


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार