*लेख-२२७* *लेखन-भरत कोळी* *(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)* 🥊🙏🏆🥇💪🎯 *"वेळ अजूनही गेलेली नाही,सुदृढ व आनंदी जीवनशैली राखण्यासाठी व्यायामाचा पर्याय निवडा"* 🥊🏑🏆🤼♂️🏓⚽🏹🏑🎽🥅🏸🤼♂️🤼♀️🏋🏻♀️🎿🥊🏏 २०२०(मार्च पासून) हे वर्ष खूप काही शिकवणं देऊन गेलं असं मला वाटतं,कारण जी लोकं व्यायामाकडे दुर्लक्ष करत होती आज तिचं लोकं व्यायामाबद्दल सांगतात की *"जर मी व्यायाम व योग केला नसता तर आज मी आरोग्याच्या समस्येने ग्रासलो असतो आणि आनंदी राहू शकलो नसतो"* असे अनेक जण आपले अनुभव वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतात,मी बऱ्याच लोकांकडून व्यायामाविषयी अनुभव ऐकून घेत असतो त्यावरून असं लक्षात येतं की *सुदृढ व आनंदी जीवनशैली राखण्यासाठी मानव आता व्यायामाचा पर्याय निवडत आहे."* ही बाब भारतीय समाजासाठी चांगली व भारताला महासत्ता बनविण्यासाठी दिशादर्शक ठरेल असं मला वाटतं,केंद्र सरकारच्या *"फिट इंडिया"* उपक्रमाच्या माध्यमातून शहरी भागात जागरूकता निर्माण होत आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्राला चालना मिळत असल्यामुळे *"भारत येणाऱ्या काळात शक्तिशाली बनेल