लेख-२२७


*लेख-२२७* 

*लेखन-भरत कोळी*

*(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*


🥊🙏🏆🥇💪🎯


*"वेळ अजूनही गेलेली नाही,सुदृढ व आनंदी जीवनशैली राखण्यासाठी व्यायामाचा पर्याय निवडा"*


🥊🏑🏆🤼‍♂️🏓⚽🏹🏑🎽🥅🏸🤼‍♂️🤼‍♀️🏋🏻‍♀️🎿🥊🏏


           २०२०(मार्च पासून) हे वर्ष खूप काही शिकवणं देऊन गेलं असं मला वाटतं,कारण जी लोकं व्यायामाकडे दुर्लक्ष करत होती आज तिचं लोकं व्यायामाबद्दल सांगतात की *"जर मी व्यायाम व योग केला नसता तर आज मी आरोग्याच्या समस्येने ग्रासलो असतो आणि आनंदी राहू शकलो नसतो"* असे अनेक जण आपले अनुभव वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतात,मी बऱ्याच लोकांकडून व्यायामाविषयी अनुभव ऐकून घेत असतो त्यावरून असं लक्षात येतं की *सुदृढ व आनंदी जीवनशैली राखण्यासाठी मानव आता व्यायामाचा पर्याय निवडत आहे."* ही बाब भारतीय समाजासाठी चांगली व भारताला महासत्ता बनविण्यासाठी दिशादर्शक ठरेल असं मला वाटतं,केंद्र सरकारच्या *"फिट इंडिया"* उपक्रमाच्या माध्यमातून शहरी भागात जागरूकता निर्माण होत आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्राला चालना मिळत असल्यामुळे *"भारत येणाऱ्या काळात शक्तिशाली बनेल."*💪

          २०२० च्या मार्च ते जुलै मधील लॉकडाऊनच्या काळात आरामदायी जीवनशैलीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली याकाळात अनेक लोकांचे वजन वाढले,चिडचिडेपणा वाढला,मानसिक ताणतणावाच्या समस्यांनी काही लोकांना ग्रासले,मधुमेहाच्या समस्या उद्भवल्या अशा अनेक समस्या या दरम्यान समोर आल्या,याच काळात *ऑनलाईनचे जाळे प्रचंड वाढले*,शाळेतले ऑनलाईन वर्ग,ऑफिसची कामे म्हणजे वर्क फॉर्म होम ही नवीन संकल्पना चांगलीच गाजली,त्याचबरोबर संघटना मिटिंग,कार्यक्रम व इतर अनेक क्षेत्रात ऑनलाईन जाळ्याने उंच्चाकी गाठली पण याचे वाईट परिणाम खऱ्या अर्थाने २०२१ मध्ये दिसून आले,कोणत्याही गोष्टीचा अतिवापर झाला तर त्याचे परिणाम लवकरचं दिसून येतात आणि ह्या ऑनलाईन जाळ्यामुळे मानसिक ताणतणावाच्या समस्येत २८% वाढ झाली असे एका संशोधन अभ्यासात लक्षात आले.२०२१ मध्ये सध्या भारतासह इतर काही देशात महामुर्ख कोरोनाच्या २ ऱ्या लाटेने महाभयानक रूप दाखवले,महाराष्ट्र,दिल्ली,उत्तर प्रदेश व इतर राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे,देशात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे.ऑक्सिजनसाठी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे भयानक चित्र सध्या आपल्या समोर उभे आहे,ह्या भयानक परिस्थितीतून संपूर्ण जग लवकर बाहेर निघो ही ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🙏

                  ह्या महामुर्ख कोरोना परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने व्यायामाचा पर्याय निवडावा, योग्य व संतुलित आहार घेण्याचे प्रयत्न करावा,वैचारिक क्षमता योग्य ठेवण्यासाठी नकारात्मक विचाराकडे लक्ष देणं टाळावे कारण *"नकारात्मक विचारामुळे मानसिक आरोग्य असंतुलित होते."* म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवत योग्य विचाराला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करावा,समाजात व्यायामाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध शारीरिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वतःला तयार ठेवा (उदा. सायकल चालवणे,मॅरेथॉन,गिर्यारोहण व इतर काही मनोरंजनात्मक खेळ उपक्रमात सहभाग) कारण आनंदी व सुदृढ जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्येला आपण सहज हरवू शकतो,आहारविषयकही वेळोवेळी जागृत रहा कारण सध्या बाजारात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खाद्य प्रोडक्ट उपलब्ध आहेत पण ते घेतांना सुध्दा डॉक्टर किंवा मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार घ्या,पैशासाठी मानव कोणत्या थराला जाऊ शकतो हे सांगता येत नाही,चांगली शरीररचना दिसावी म्हणून काही पावडर घेण्याचे टाळा,घेत असाल तर योग्य प्रशिक्षक किंवा आहारतज्ञ याचा सल्ला आवश्यक घ्यावे ही नम्र विनंती भविष्यासाठी आहे,भविष्यात महामुर्ख कोरोनासारख्या काही आजाराला सामोरे जावं लागलं तर स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायाम,योग,संतुलित आहार याविषयी जागृत रहा मैदानाचा अवलंब कराचं कारण भविष्यात आरोग्याच्या समस्याला वेळोवेळी सामोरे जाऊ शकतो असं मला आजची स्थिती पाहून वाटतं म्हणून *"वेळ अजूनही गेलेली नाही,सुदृढ व आनंदी जीवनशैली राखण्यासाठी व्यायामाचा पर्याय निवडा."*


🖋️🖋️

*"खेळाडूंनीही व्यायामसह,मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करावा"* प्रशिक्षकांच्या व मार्गदर्शकांच्या योग्य सल्ल्यानुसार क्रीडा कौशल्य व व्यायाम कार्यक्रम तयार करावा(महिना किंवा आठवड्याचा),घरी टाकाऊ वस्तू पासून व्यायामाचे साहित्य बनवता येईल का ..? व त्याआधारे आपले क्रीडा कौशल्य कसं वाढवता येईल यावर प्रशिक्षकांशी संवाद साधावा, आपला फिटनेस कसा टिकवून ठेवता येईल आणि याचा उपयोग आगामी क्रीडा स्पर्धेत कसा करून घेता येईल याच थोडं आत्मचिंतन करावे, ताणतणाव मुक्त रहा, सकारात्मक विचार करा,जिंकण्याचे ध्येय ठेवा,संयम सोडू नका.

        मार्गदर्शक व प्रशिक्षकांनी दिलेल्या उपक्रम/कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा त्यांच्याजवळ करा,विविध क्रीडा कौशल्य कसं आत्मसात करता येईल आणि नव्या योजना किंवा क्रीडा डावपेच कशा प्रकारे आखता येतील याविषयी संघातील सहकारी खेळाडू किंवा सिनिअर खेळाडूंशी चर्चा करा जेणेकरून तुम्हाला अधिक फायदा कोरोना नंतर होणाऱ्या स्पर्धेत दिसून येईल.


💪💪✔️🥊⚽🤼‍♀️🎯✒️


*"खेळाडूंनो आपण आनंदी जीवनशैलीचा उत्तम पर्याय निवडा व्यायामाविषयी जनजागृती करा,कारण तुमच्या जनजागृती करण्याचा फायदा भविष्यात तुम्हालाचं मिळेल."*


🖋️टोकियो(जपान) येथे २०२० मध्ये होणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुध्दा महामुर्ख कोरोना संकटामुळे १ वर्षे पुढे ढकलण्यात आल्या(जुलै २०२१ मध्ये होणार आहे,आजपासून ७७ दिवस बहुतेक) २०२१ मध्ये ह्या क्रीडा स्पर्धा संपूर्ण तयारीसह खेळाडूंच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे नियमांचे पालन करत ही स्पर्धा होणार असल्याचे संकेत ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजन समितीने स्पष्ट केले आहे.


🖋️ आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा कोरोनाच्या नियमाचे पालन करत विना प्रेक्षकांच्या रंगल्या त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धेसाठी व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करत असलेल्या खेळाडूंचे मनोबल ह्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे वाढले.


उत्तर प्रदेश(अयोध्या) येथे राष्ट्रीय कबड्डी क्रीडा स्पर्धा मागच्या महिन्यात संपन्न झाल्यामुळे *"कबड्डी विश्वात"* प्रसन्न वातावरण निर्माण झालं,एप्रिल महिन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता विविध क्रीडा स्पर्धा आयोजनाचे रद्द केलं.


🖋️ IPL सुध्दा पुढे ढकलण्यात आल्या.(उर्वरित स्पर्धा नंतर होणार आहेत)


*#कोरोना नंतर क्रीडा क्षेत्र नव्याने बहरेल आणि क्रीडा पंख मुक्तपणे मैदानावर उडतांना दिसतील.#*



*"वेळ अजून गेलेली नाही व्यायामाचा पर्याय निवडा आनंदी रहा."*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

🚩शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी "विजेंद्र जाधव" यांची प्रशिक्षक म्हणून निवड🥊

हंटर कमिशन 1882 (भारतीय शिक्षण सुधारणा आयोग) यांनीही "क्रीडा क्षेत्राचा विकासास भर दिला.