मुंबई : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक आज मुंबईत उत्साहात संपन्न झाली. या निवडणुकीत आमदार प्रविण दरेकर हे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले असून त्यांना तब्बल ४३ मते मिळाली. तर धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्षपदावर ४३ मते मिळवत आपला विजय नेतृत्व सिद्ध केले. धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे हे विभागीय सचिवपदी बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा वर्तुळात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. या निवडणुकीत प्रामाणिकपणा, कष्ट आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा यांचे वर्चस्व दिसून आले. स्पर्धा चुरशीची असली तरी अखेरीस संघटनात्मक एकतेचा आणि स्वच्छ कारभाराचा विजय झाला. राज्यभरातून आ. जय कवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला असून महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळ नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला आहे. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड. मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 (बॉक्सिंग स्पर्धा) साठी धुळे जिल्ह्यातील अनुभवी पंच मयूर शशिकला लक्ष्मण बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) – ड्रॉ-कमिशनर म्हणून निवड करण्यात आली आहे. मयूर बोरसे यांनी यापूर्वी राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धा, विविध राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धा तसेच पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या अचूक निरीक्षणशक्ती, नियमांचे सखोल ज्ञान आणि शांत, निष्पक्ष निर्णयक्षमतेमुळे ते राज्यभरातील पंचांमध्ये विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे, गेल्या 15 वर्षांपासून ते धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्य पाहत असून या कालावधीत त्यांनी स्पर्धांचे तांत्रिक व्यवस्थापन, पंचांचे मार्गदर्शन, नियमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच स्पर्धा आयोजनामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्य...
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मा. प्रवीण दरेकर साहेब आणि मा. जय कवळी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व २७ जागांवर विजयी होत ऐतिहासिक कामगिरी केली. संपूर्ण पॅनेलचा हा एकमताचा विजय महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्रीडा क्षेत्रातील विश्वास, संघटित बळ आणि पारदर्शकतेचे द्योतक ठरला आहे. या दणदणीत विजयानंतर विजयी उमेदवारांनी वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करून विशेष शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील क्रीडा विकासासाठी नव्याने निवडून आलेले पदाधिकारी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि खेळाडू-केंद्रित कार्य करतील, असा विश्वास मा. फडणवीस साहेबांनी व्यक्त केला.
छान संदेश...🥊👍
ReplyDelete