चंद्रपूर येथे शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत धीरज पाटील व ऋषिकेश अहिरे यांची पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी
चंद्रपूर येथे शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत धीरज पाटील व ऋषिकेश अहिरे यांची पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी
दिनांक ८ ते ११ फेब्रुवारी २०२३ भद्रावती चंद्रपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा १४ व १७ वयोगट मुले/मुली या स्पर्धेत धीरज पाटील व ऋषिकेश अहिरे यांनी स्टार टू पंच म्हणून काम पाहिले धीरज पाटील हे धुळे येथील एम.आर.पटेल सीबीएसई स्कूल शिरपुर येथे बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून काम पाहतात, धीरज पाटील यांनी यादी पंच म्हणून पालघर येथे झालेल्या १९ वर्षा आतील मुले/मुली शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पंच, पुणे महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पंच, चेंबूर, मुंबई ज्युनियर राज्य बॉक्सिंग स्पर्धा पंच अश्या विविध ठिकाणी पंच म्हणून धीरज पाटील भूमिका बजावतात, धीरज पाटील यांनी नंदुरबार येथे झालेल्या राज्य बॉक्सिंग स्टार टू पंच परीक्षेत ९६ मार्क मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता व ऋषिकेश अहिरे यांनी पहिल्यांदा दिनांक ८ ते ११ फेब्रुवारी २०२३ भद्रावती चंद्रपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा १४ व १७ वयोगट मुले/मुली या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले ऋषिकेश अहिरे हे स्वतंत्र मायक्रो फायनान्स मध्ये क्रेडिट ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहतात.
दिनांक ८ ते ११ फेब्रुवारी २०२३ भद्रावती चंद्रपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा १४ व १७ वयोगट मुले/मुली या स्पर्धेत धीरज पाटील व ऋषिकेश अहिरे यांनी स्टार टू पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष कैलास जैन, शिरपूर सुवर्णनगरीचे नगरसेवक रोहित रंधे, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे यांनी शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment