‼️अनुभवाची शिदोरी घेऊन शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय. # प्रयोग क्रमांक-११२#‼️
‼️अनुभवाची शिदोरी घेऊन शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय. #प्रयोग क्रमांक-११२#‼️
- भरत कोळी (शारीरिक शिक्षण शिक्षक)
👇
"त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे हावभाव माझ्या मनाला समाधान देऊन गेलीत."😁😁
काल मला जयहिंद इंग्लिश स्कूलच्या ज्युनिअर के.जी.च्या वर्गावर शिकविण्याची संधी मिळाली आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेत आनंदी अनुभव घेतला,खरंतर शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून माझी प्रथम जवाबदारी असते ती म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासाला (शारीरिक व मानसिक) चालना देणारे शैक्षणिक प्रयोग राबविणे असते, शालेय स्तरावरचं मुलांचा "मुलभूत हालचालींचा व मुलभूत कारक कौशल्याचा विकास" साधला जातो, काल मी तेचं पॅराशुट ह्या कापडी साहित्याच्या माध्यमातून ह्या लहान गटातील विद्यार्थ्यांच्या हातातील ताकद वाढविण्यासाठी गमतीशीर प्रयोग राबवला आणि त्यामुळे त्या लहान मुलांमधील ताकद ही आपो- आप त्यांच्या आनंदात दिसत होती, खरंतर स्वतःला समाधान वाटलचं पण त्यापेक्षा "त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे हावभाव माझ्या मनाला समाधान देऊन गेलीत." खुप आनंद घेतला त्यांनी A ते Z मध्ये स्वतःचे नावाचे गणित सोडवले व त्यावर आधारित ताकदीचे खेळ कालच्या तासिकेत झाल्यामुळे बराच आनंद त्यांनी घेतला.
"सर्वांगीण विकासाची पंचसूत्री योजना ही मुलांच्या यशाला अधिक बलशाली बनवत असते."
खरंतर तर शालेय स्तरावर आनंदी वातावरणाची निर्मिती ही मुलांच्या बौद्धिक, सामाजिक, शरीरिक, मानसिक व भावनिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरत असते,पण आजच्या २१ व्या शतकातील आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातील शैक्षणिक क्षेत्रात झालेली प्रगती ही असंख्य अशा बाबींवर अवलंबून असल्याने कुठेतरी मुलांचा आनंद हा मंध्यांतरीच्या काळात हरवला होता आणि काळानुसार बदलत जाणारी राहणीमान अशा विविध बाजूंनी आजच्या विद्यार्थ्यांची आनंदी जीवनशैलीचे सूत्रे कोणीतरी चोरली की काय अशी खंत मला नेहमीचं वाटत असते, असो पण थोडं आनंदी, गमतीशीर प्रयोगाच्या सानिध्यात राहून क्रियाशील व उपक्रमशील शिक्षण हे मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारी बलशाली अशी शैक्षणिक व्यवस्था ठरते, आणि तीच प्रक्रिया आमच्याकडुन शालेय स्तरावर शिक्षक म्हणून होणे अपेक्षित असते, मुलांचे वय वर्षे ३ ते ७, ७ ते १० व १० ते १४ अशा विविध अवस्थेत आनंदी शिक्षणाचे वातावरण निर्मिती करणं हे मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व विकासाला गती देत असते,पण सध्याच्या काळात मुलांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझं, शासनाचे बेभरवशाचे विविध उपक्रम, छडीचा नायनाट, पालकांच्या मुलांकडून अति-अपेक्षा, पालकांचे मुलांकडे होणारं दुर्लक्ष, शिक्षक-पालक समन्वय नसणं अशा विविध बाबींमुळे आनंदी शिक्षणाचा प्रयोग हा प्रभावी ठरत नाही, असो पण जे मुलांच्या सर्वांगिण विकासाला गती देईल ते प्रभावी प्रयोग आम्ही सातत्याने राबवू.
आनंदी जीवनशैलीचा उपभोग घेणं हे भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी शालेय स्तरावर "सेन्सिटिव्ह रित्या शारीरिक शिक्षणाचे नवं विश्व आम्ही राबवत आहो."
धन्यवाद
🙏
![]() |
| भरत कोळी (शारीरिक शिक्षण शिक्षक) |

Comments
Post a Comment