मुंबई : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक आज मुंबईत उत्साहात संपन्न झाली. या निवडणुकीत आमदार प्रविण दरेकर हे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले असून त्यांना तब्बल ४३ मते मिळाली. तर धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्षपदावर ४३ मते मिळवत आपला विजय नेतृत्व सिद्ध केले. धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे हे विभागीय सचिवपदी बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा वर्तुळात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. या निवडणुकीत प्रामाणिकपणा, कष्ट आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा यांचे वर्चस्व दिसून आले. स्पर्धा चुरशीची असली तरी अखेरीस संघटनात्मक एकतेचा आणि स्वच्छ कारभाराचा विजय झाला. राज्यभरातून आ. जय कवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला असून महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळ नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला आहे. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मा. प्रवीण दरेकर साहेब आणि मा. जय कवळी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व २७ जागांवर विजयी होत ऐतिहासिक कामगिरी केली. संपूर्ण पॅनेलचा हा एकमताचा विजय महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्रीडा क्षेत्रातील विश्वास, संघटित बळ आणि पारदर्शकतेचे द्योतक ठरला आहे. या दणदणीत विजयानंतर विजयी उमेदवारांनी वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करून विशेष शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील क्रीडा विकासासाठी नव्याने निवडून आलेले पदाधिकारी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि खेळाडू-केंद्रित कार्य करतील, असा विश्वास मा. फडणवीस साहेबांनी व्यक्त केला.
धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५ महिला सशक्तीकरणाचा मंत्र – आत्मविश्वास, ताकद आणि जिद्द! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाला चालना देण्यासाठी धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन आणि हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्च २०२५, रविवार रोजी ही स्पर्धा हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे आणि उपाध्यक्ष कैलास जैन, सहसचिव लिंबाजी प्रताळे, खजिनदार जितेंद्र बोरसे, किशोर पाटील, योगेश पाटील यांनी महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये समाविष्ट: महिला बॉक्सिंगसाठी विशेष प्लॅटफॉर्म निर्माण करणे महिला खेळाडूंच्या कौशल्यांना वाव देणे आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे महिलांमध्ये आत्मवि...
Comments
Post a Comment