मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज



छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त राजकीयच गोष्टी सांगितल्या जातात...

औरंगजेबाशी युद्ध, अफजलखानाचा कोथळा, शाहीस्तेखानाची बोटे, आग्र्याहून सुटका इ इ.


पण मला भावलेले छत्रपती शिवाजी अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतात :


१. आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी हे खरे "सामाजिक क्रांतीकारक" होते !

२. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये, हा आदेश देणारे "लोकपालक राजे" होते !

३. हातात तलवारीबरोबर पट्टी घेऊन जमीन मोजून नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते !

४. विना कारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते !

५. समुद्रप्रवास करण्यास हिंदूधर्मात बंदी होती, तो विरोध पत्करून आरमार उभे केले. धर्मापेक्षा देशहीत मोठे हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते !

६. अमावस्येच्या रात्री लढाया करून त्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे सुधारक" होते हे नक्की !


त्यांनी ३५० वर्षांपूर्वी सुरु केलेली पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे त्यावरून ते नक्कीच *आधुनिक विचारसरणीचे* होते, हे नक्की !

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५