"भारतीय महिला बॉक्सिंग संघ जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत हजारो भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करेल."
"भारतीय महिला बॉक्सिंग संघ जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत हजारो भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करेल."
धुळे - नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर १५ मार्च ते २६ मार्च २०२३ दरम्यान आयोजित होणाऱ्या 'जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप -२०२३' चे आयोजन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय क्रीडा मंत्रालय यांच्या अनमोल सहकार्याने आयोजित केली आहे,भारताने यापूर्वी ही जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यशस्वी असं आयोजन केलं होतं,सध्या भारत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या रँकिंगमध्ये ३ स्थानी असल्यामुळे पहिल्या स्थानावर विराजमान होण्यासाठी ही स्पर्धा भारतासाठी अतिशय महत्वाची ठरेल,भारत तिसऱ्यांदा या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करत असल्याने भारतात बॉक्सिंग खेळाचे जाळे हे तळागळापर्यंत अधिक वेगाने विणले जाईल यात शंका नाही, भारतात बॉक्सिंग खेळासाठी दिवसेंदिवस पोषक वातावरण तयार होत असल्याने येत्या काळात भारतीय बॉक्सिंगपटू ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा,जागतिक क्रीडा स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित करतील, दिल्लीत होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही हजारो महिलांना मानसिकबळ व प्रेरणा देणारी असेल,खरंतर ६ वेळची जगज्जेती एम.सी. मेरी कोम हिने भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, तिने जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (World women Boxing championship) ६ वेळेस विजेतेपद मिळवणारी जागतिक पातळीवरची एकमेव महिला खेळाडू मेरी कोम आहे,तर जागतिक स्पर्धेत ६ सुवर्ण, १ रौप्य, १कांस्य , ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत १ कांस्य व याव्यतिरिक्त तिने विविध बॉक्सिंग स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत, तिच्याकडून अनेक भारतीय महिलांनी प्रेरणा घेत बॉक्सिंग रिंगवर पंच का दम दाखवला आहे आणि हीचं झलक नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर १५ मार्च ते २६ मार्च २०२३ दरम्यान होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दिसेल,कधी काळी भारतात बॉक्सिंग खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पुरुषी खेळ म्हणून पाहिलं जायचं पण मेरी कोमच्या बॉक्सिंग संघर्षाने बॉक्सिंग खेळ हा घराघरांत पोहोचला आणि त्यामुळे मेरी काम हे नाव आज प्रत्येकाच्या ओठावर आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने स्वतःला झोकुन देत बॉक्सिंग रिंग वर राज्य केलं,मेरी कोम हे नाव ऐकलं की एक वेगळी ऊर्जा शरीरात निर्माण होते त्यामुळे तिने जो संघर्ष केला तसा संघर्ष आज पुन्हा होणं नाही पण तिच्या सारख्या बॉक्सर तयार होतील असं प्रेरणादायी सुत्र तिने भारतीय महिला बॉक्सिंग खेळाडूंसमोर मांडल्यामुळे आज भारतात जगातिक विजेतेपद मिळविणाऱ्या महिला बॉक्सिंग पटू पुढे येत आहे, त्यात आपल्या महाराष्ट्राची स्टार खेळाडू व जागतिक युथ स्पर्धेची जगज्जेती देविका घोरपडे असेल किंवा अल्फिया पठाण असेल अशा संपुर्ण भारतातील अनेक महिला खेळाडू असतील ज्यांनी जागतिक स्तरावर पंच का दम दाखवला.
नवी दिल्लीत होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सिंग संघ विजयाचे दीर्घ यश घेऊन प्रचंड आत्मविश्वासाने उतरेल यात शंका नाही,या संघासमोर मेरी कोमचा संघर्ष डोळ्यासमोर उभा असेल तर हजारो भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करण्याची प्रेरणा त्यांच्याकडे असेल असं म्हणायला हरकत नाही, नुकतेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचा शुभंकर असलेल्या 'वीरा' चे अनावरण करण्यात आले,जगातील सर्वात वेगवान प्राणी असणाऱ्या चित्त्याचे नाव वीरा आहे आणि त्याचे प्रतिक हे शक्ती,शौर्य, साहस असल्याने नारी शक्तीला अधिक बळ देईल, ही स्पर्धा अतिशय देखणी व बक्षीसांचा वर्षाव असणारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप ठरणार आहे, जवळजवळ २० करोड रक्कमेची (बक्षीस रक्कम स्वरूपात असेल) बक्षीसे असल्याने ही स्पर्धा अधिक यशस्वी होईल,या जागतिक स्पर्धेत पात्र असलेले ७४+ देशांतील महिला बॉक्सिंग संघ भारतात पंच का दम दाखवणार आहेत, जवळजवळ ३५०+ महिला खेळाडू सहभागी होत आहे, यात ऑलिम्पिक पदक विजेत्या, जागतिक,आशियाई,कॉमनवेल्थ स्पर्धेतील विजेत्या नामांकित खेळाडूंसाठी खुप आव्हानात्मक असणार आहे, भारतीय महिला बॉक्सिंग संघासाठी ही जागतिक चॅम्पियनशिप महत्वाची ठरेल कारण पुढच्या वर्षी होणाऱ्या २०२४ ची पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लक्षात घेता, पात्रता फेरी असेल किंवा स्वयं कामगिरीचा आलेख उंचविण्यासाठी व संघात स्थान मिळविण्यासाठी बॉक्सिंग रिंगच्या चौकटीत उत्कृष्ट कामगिरी करत पदक मिळविणे हे भारतीय महिला बॉक्सिंग संघाचे लक्ष असेल, खास करुन मागील जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपची विश्वविजेती निखत झरीन व २०२० ची टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती लवलिना बोरोगोहन,स्विटी बोरा, बॉक्सर नीतू यांच्याकडून सुवर्णपदकांच्या अपेक्षा असतील,बॉक्सर निखत झरीन मागील जागतिक स्पर्धेत मिळविलेले सुवर्णपदक हे तिच्यासाठी प्रेरणा ठरेल तर बॉक्सर लवलिना बोरोगोहन कडे जागतिक स्पर्धेचे दोन कांस्यपदक असल्यामुळे तिचा अनुभव पाहता जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ती सुवर्ण कामगिरी करेल,मागील काही दिवसांपासून जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय बॉक्सिंग शिबिरात देशी-विदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग सरावाचे धडे भारतीय महिला संघाने गिरविले होते विशेष म्हणजे ही जागतिक चॅम्पियनशिप भारतातच होत असल्याने वातावरणाचे आव्हान नसेल,त्यामुळे इतर दडपण सोडुन विजयाचे आव्हान समोर असेल, विविध वजनी गटात भारतीय महिला बॉक्सिंग संघ जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला शक्तीचे प्रतिनिधित्व करेल (अर्थात भारताचे प्रतिनिधित्व करेल) बॉक्सर नीतू घांघस (४८ किलो), बॉक्सर निखत झरीन (५० किलो),बॉक्सर साक्षी चौधरी (५२ किलो), बॉक्सर प्रिती दहीया (५४ किलो), बॉक्सर मनिषा मौन (५७ किलो), बॉक्सर जस्मिन (६० किलो), बॉक्सर शशी चोप्रा (६३ किलो), बॉक्सर मंजू बोंबरिया (६६ किलो), बॉक्सर सनामा चानू (७० किलो), बॉक्सर लवलिना बोरोगोहन(७५ किलो), बॉक्सर स्विटी बोरा (८० किलो), नुपूर शेरोन (८१+).नुकत्याच चार दिवांसापूर्वी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने भारतीय महिला बॉक्सिंग संघाला शुभेच्छा व प्रोत्साहनासाठी आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात भारताचे क्रीडा मंत्री अनुरागजी ठाकूर, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी खेळाडूंशी संवाद साधत चर्चा केली व जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी संपुर्ण बॉक्सिंग परिवाराला शुभेच्छा दिल्या.
भरत कोळी
(शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक, धुळे)
"भारतात होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन हे लाखो महिलांच्या क्रीडा पंखांना बळ देईल आणि हा भारतीय समाज या स्पर्धेचा शुभंकर असलेल्या वीरा सारखे महिलांचे शक्ती,शौर्य, साहस ओळखेल."
-भरत कोळी
(शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक, धुळे)
"नारी शक्तीचे शौर्य हे दिल्लीत आयोजित होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या बॉक्सिंगरिंग च्या रणात रणरागिणी सारखे दिसेल."
ऋषिकेश अहिरे
(धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना समन्वयक)



Comments
Post a Comment