"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी"
"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी" धुळे - ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त समस्त नारी शक्तीला आमच्या क्रीडा परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि याचं अनुषंगाने माझा आजचा लेख नारी शक्तीला समर्पित असेल,खरंतर प्रत्येक दिवस हा नारी शक्तीचा असायला हवा कारण तिच्या सारखं सामर्थ्य हे आज कोणाकडेच नाही,ती प्रत्येक क्षेत्रात पारंगत राहत तिच्या बलाढ्य अशा आत्मविश्वासामुळे त्या-त्या क्षेत्राचा विकास हा प्रगतीपथावर आहे, त्यामुळेच तिला तिच्या जीवनातील सामर्थ्याचे संपूर्ण स्वतंत्र हवं,विशेष म्हणजे ती पुरुषांच्या बरोबरीने आज अनेक क्षेत्रात उतुंग भरारी घेत सक्षम असल्याने "चूल आणि मूल" ही पडद्याआड संस्कृती बाजूला ठेवून तिचा आदर आपल्या समाजाने केला पाहिजे तेव्हाच 'नारी शक्तीचा जागर' खऱ्या अर्थाने होईल,आजही आपला समाज लिंगामुळे तिच्या कार्याला कमी लेखतो आणि हिचं बाब आपल्या समाजाला अधोगतीकडे घेऊन जाते खरंतर घर व समाज यांच्या विकासाच्या बाबतीत पुरुष व स्त्री या दोघांचे समान योगदान असतं तरी पण आपण ती महिला आहे म्हणून तिला पाहिजे तसं स्वतंत्र देऊ शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आपल्