"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-१)

 

"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-१)



धुळे - २१ व्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विज्ञान युगात जर आपल्या मुलांना सुदृढ,निरोगी आयुष्यासह व आनंदी जीवनशैलीसह यशस्वी बनवायचं असेल तर त्यांचा 'सर्वांगीण विकास'होणं हे फार गरजेचं आहे आणि तो शारीरीक,मानसिक,बौद्धिक, भावनिक,सामाजिक,आध्यामिक व व्यावसायिक अशा सप्तरंगाच्या घटकांवर अवलंबून आहे,त्यामुळे सर्वांगीण विकासाची प्रभावी अंमलबजावणी सातत्याने होणं हे आजच्या आधुनिक युगासाठी फार महत्वाचं असेल पण ही प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी माध्यम कोणतं असावं..? असा जर प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होत असेल तर अजिबात चिंता करण्याची गरज नाही कारण शालेय प्राथमिक/माध्यमिक स्तरावर राबविण्यात येणारा अभ्यासक्रम हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनेचं असतो त्यात वरील सर्व घटक हे अंतर्भूत असतात, तरी पण सर्वांगीण विकासाच्या बाबतीत ओरड का..? हा ही एक प्रश्न आहेच, मग आपल्याला थोडं राज्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा व नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांचा 'सर्वांगीण विकास' हाचं मुख्य:ता केंद्रबिंदू आहे,मग या संबंधी अनेक योजना,अभ्यासक्रम,संशोधन, पाठ्यपुस्तके व विविध उपक्रमांची आखणी शालेय स्तरावरील अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला दिसतो,असं असूनही सर्वांगीण विकासाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जर चळवळी उभ्या कराव्या लागत असतील तर ते दुर्दैवचं आहे.

         खरंतर आजच्या शैक्षणिक क्षेत्रात वाढते खाजगीकरण याला बऱ्यापैकी कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही,१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात,विशेष १९९१ च्या दशकात जागतिकीकरण,खासगीकरण,उदारीकरण धोरणांचा अवलंब झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातही 'उ-खा-जा' या धोरणाचा स्वीकार आजपर्यंत वाढत गेलेला दिसतो आणि त्यामुळेच शैक्षणिक धोरणात केंद्रबिंदु असलेल्या 'सर्वांगीण विकासाच्या' प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी हळूहळू कमी होत गेली,यासाठी आपण असर व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संघटनांचा अहवाल बघणं हे पालक किंवा समाजाचा एक जवाबदार घटक म्हणून फार महत्त्वाचं आहे आणि ती काळाजी गरज आहे, विशेष म्हणजे आजच्या वाढत्या खाजगीकरणामुळे शालेय स्तरावरील शिक्षण व्यवस्था ही "सुंदर व आकर्षक वाटणाऱ्या फुगीर व्यवस्थेतेची पोकळ अशी कडू कहाणी" अशीच मला वाटते,सर्वांगीण विकासाची संकल्पना ही मुलांच्या भविष्यासाठी 'सप्तरंगी इंद्रधनुष्य असा यशस्वीतेचा प्रभावी प्रयोग असाचं आहे पण 'सुंदर व आकर्षक वाटणाऱ्या मोह-मायेला बळी पडलेल्या शासनाला शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत घेणं-देणं नाहीच हेचं वास्तव्य आहे आणि हे नाकारता येत नाही,त्यात श्रीमंत-गरीब असा नवा अध्यायाचा जन्म ह्या खाजगीकरणाच्या धोरणाने दिला, विद्यार्थ्यांचा आनंद हरवला,आजच्या शालेय स्तरावर कधी न पाहिलेल्या ताण-तणावाची समुपदेशन केंद्र बघायला मिळतात,शारीरिक रचनेत व्याधी निर्माण होतील असं दप्तराचे ओझं वाढवलं गेलं,आवडत्या क्षेत्रात न आवडती बाब विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली जाते,जिथं प्राथमिक स्तरावर मुलांकडून अपेक्षाचं ओझं ठेवलं जातं, शारीरिक व मानसिक आरोग्याकडे नको त्या गरजेपेक्षा शिक्षणाचं ओझं ठेवल्यामुळे दुर्लक्ष केलं जातं, गुंतागुंतीचे शिक्षणाने ताण-तणावाच्या घटना मुलांच्या अवती-भोवती फिरवत आवश्यक मूल्यांची शिकवण कमी केलं जातं मग अशा व्यवस्थेत शालेय विद्यार्थ्यांचे वय/ग्रहण क्षमता यांचा विचार केला जातो का..? त्याला हवं तसं अपेक्षित शिक्षण मिळतं का.?, पालकांची दिशाभूल खरचं होते का..? असे प्रश्न जेव्हा-जेंव्हा उद्भवतात तेंव्हा-तेव्हा 'सर्वांगीण विकासाचे' मला नेहमीचं स्मरण होते,खरंतर शिक्षणाचा अर्थ व्यक्तीच्या वर्तनामध्ये कायमस्वरूपी विधायक बदल घडून येणे असा आहे,ज्यामुळे बालकास भावी जीवन,आनंदी,सुदृढ,निरोगी व देशाच्या विकासात हातभार लावण्याचे आत्मज्ञान तयार होते अशी शिक्षण प्रक्रिया मुलांच्या भविष्यासाठी आवश्यक असते आणि त्यासाठी सर्वांगीण विकासाची प्रभावी अंमलबजावणी होणं अपेक्षित असतं.

(भाग -२ मध्ये पुढील चर्चा)







भरत कोळी

(शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक,धुळे)

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

"धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास म्हणजे संघर्षमय आणि प्रेरणादायी... "