"भारतीय महिला बॉक्सिंग संघ जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत हजारो भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करेल."
"भारतीय महिला बॉक्सिंग संघ जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत हजारो भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करेल." धुळे - नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर १५ मार्च ते २६ मार्च २०२३ दरम्यान आयोजित होणाऱ्या 'जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप -२०२३' चे आयोजन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय क्रीडा मंत्रालय यांच्या अनमोल सहकार्याने आयोजित केली आहे,भारताने यापूर्वी ही जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यशस्वी असं आयोजन केलं होतं,सध्या भारत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या रँकिंगमध्ये ३ स्थानी असल्यामुळे पहिल्या स्थानावर विराजमान होण्यासाठी ही स्पर्धा भारतासाठी अतिशय महत्वाची ठरेल,भारत तिसऱ्यांदा या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करत असल्याने भारतात बॉक्सिंग खेळाचे जाळे हे तळागळापर्यंत अधिक वेगाने विणले जाईल यात शंका नाही, भारतात बॉक्सिंग खेळासाठी दिवसेंदिवस पोषक वातावरण तयार होत असल्याने येत्या काळात भारतीय बॉक्सिंगपटू ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा,जागतिक क्रीडा स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित करतील, दिल्लीत होणाऱ्या जागतिक महिला ब