Posts

'वाद राज्य संघटनेत,समिती जिल्ह्यात- सत्ता संघर्ष'

Image
'वाद राज्य संघटनेत,समिती जिल्ह्यात- सत्ता संघर्ष'      राज्यात एखादा खेळ वाढविण्यासाठी राज्य क्रीडा संघटनेची फार मोठी भूमिका किंवा जवाबदारी असते,त्यात खेळाबाबत ध्येय,धोरणे तयार करणे,नियम,अटी बनविणे,खेळाच्या विकासाठी जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हा क्रीडा संघटना स्थापन करून त्यांना खेळाचा प्रचार-प्रसारासाठी योग्य ते मार्गदर्शन करून वेळोवेळी संधी देत राहणे ही फार मोठी जवाबदारी राज्य क्रीडा संघटनेची असते,खरंतर जिल्ह्यातील संबंधित खेळामध्ये कार्यरत असलेल्या क्रीडाप्रेमींना व माजी खेळाडूंना हाताशी धरून जिल्ह्यात सदर खेळ कसा वाढेल तेथून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदक विजेते खेळाडू कसे तयार होतील असे हेरणारे कार्यकर्ते शोधून पाठबळ देण्याची गरज असते,खेळाचा योग्य प्रचार व प्रसारासाठी जिल्हा संघटना मैलाचा दगड असतो हे लक्षात घेऊन राज्य संघटना असावी,जिल्हा संघटनांची योग्य ती बांधणी करावी,योग्य लोकांना संधी द्यावी विशेष म्हणजे खेळ जास्तीत-जास्त राजकारणापासून दूर राहील ही काळजी घेणं अपेक्षित असतं,पण खेळाच्या विकासासाठी आश्रयदाते राजकारणी लागतातंच यात माझं दुमत नाह...

"धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास म्हणजे संघर्षमय आणि प्रेरणादायी... "

Image
धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास हा सहज नाही, अगदी तळागळातून व सामान्य गरीब कुटूंबातील मुलं जेव्हा बॉक्सिंग खेळाकडे वडत 'बॉक्सिंग खेळाचं रोपट्यापासून एक सुंदर झाड' तयार झालं तेंव्हा ही संघटना बॉक्सिंग खेळात बहुमोल कार्य करत होती, खरंतर जिल्ह्यात बॉक्सिंग खेळासाठी मयूर बोरसे सारख्या कार्यकर्त्याने स्वतःचं युवा भविष्य बॉक्सिंगसाठी २००८ पासून ते आजपर्यंत काटेरी प्रवास केला असं म्हणायला हरकत नाही व तो आजही अधिक जोमाने पुढे सुरूचं आहे, गेल्या १६-१७ वर्षांत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप कठीण प्रसंगांचा सामना सामोरे करत बॉक्सिंग खेळात पदके जिंकली तर हा खेळ धुळे जिल्ह्यात वाढविण्यात मोलाचं योगदान दिलं, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा संघर्षमय प्रवास हा सहज कोणाच्या लक्षात येणार नाही पण ज्यांनी ह्या प्रवासाला जवळून पाहिलं आहे त्यांना नक्कीचं अभिमान वाटेल,संपूर्ण महाराष्ट्रभर धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेची ओळख निर्माण करण्यात जिल्ह्याचे महासचिव मयूर बोरसे यांनी सिंहाचा वाटा उचलला, खेळाडू,प्रशिक्षक आणि पदाधिकारी म्हणून त्यांची भूमिका अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी असेल त्यांनी आपल्या...

जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

Image
जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा संपन्न   हस्ती पब्लिक स्कूल क्रीडा संकुल दोंडाईचा येथे झालेल्या धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन, हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त भव्य बॉक्सिंग स्पर्धेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष वैशाली महाजन माजी सभापती पाणीपुरवठा विभाग दोंडाईचा, कार्यक्रमाची उद्घाटक युतिका भामरे वैद्यकीय अधिकारी दोंडाईचा, दीप प्रज्वलन स्मितल गोस्वामी दंत आरोग्य तज्ञ, सकीना भारमल समन्वयक नियंत्रक हस्ती ग्रुप दोडाईचा, प्रमुख पाहुणे जयश्री सोमवंशी आर्किटेक्ट, आशा मन्सुरी ॲडवोकेट, सुरेखा काळे पोलीस कॉन्स्टेबल, हस्ती स्कूल क्रीडा प्रमुख जितेंद्र सुरवाडे, जळगाव शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव निलेश बाविस्कर, हॉकी संघटनेचे सचिव प्रशिक्षक दुर्गेश पवार, तलवारबाजी प्रशिक्षक विशाल पवार, शारीरिक शिक्षण शिक्षक योगेश पाटील, प्रा.भरत कोळी, बॉक्सिंग प्राशिक्षक पवन शिरसाठ, सर्व पंच प्रशिक्षक धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते राष्ट्रीय खेळाडू माहेश्वरी चोपडेचा सन्मान करण्यात आला. व...

धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५

Image
धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५  महिला सशक्तीकरणाचा मंत्र – आत्मविश्वास, ताकद आणि जिद्द! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाला चालना देण्यासाठी धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन आणि हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्च २०२५, रविवार रोजी ही स्पर्धा हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे आणि उपाध्यक्ष कैलास जैन, सहसचिव लिंबाजी प्रताळे, खजिनदार जितेंद्र बोरसे, किशोर पाटील, योगेश पाटील यांनी महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये समाविष्ट: महिला बॉक्सिंगसाठी विशेष प्लॅटफॉर्म निर्माण करणे महिला खेळाडूंच्या कौशल्यांना वाव देणे आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे महिलांमध्ये आत्मवि...

पंच भूमिका प्रामाणिक असावी

Image
 

धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेची बॉक्सिंग खेळाची प्रचार-प्रसार संदर्भात बैठक संपन्न.

Image
 

जय कवळी यांना निलंबन करण्याचा आदेश रद्द.

Image
मुंबई उच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्ती सुश्री रेवती मोहिते डेरे आणि सुश्री नीला केदार गोखले यांच्या खंडपीठाने बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया या बॉक्सिंगच्या भारतीय महासंघाचे प्रमुख संस्थापक आणि माजी सरचिटणीस श्री. जय कवळी यांच्याविरुद्धचा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा आणि त्यांच्या शिस्तपालन समितीने दिलेल्या अहवालावरून केलेल्या निलंबनचा आदेश रद्द केला ! या प्रकरणातील सर्व मुद्दे लक्षात घेता न्यायमूर्तीने असे नमूद केले की ८ जानेवारी २०२२ रोजीच्या विवाद आणि शिस्तपालन आयोगाचे निष्कर्ष आणि शिफारशी रद्द करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही ! " कार्यकारिणीने १० जानेवारी २०२२ च्या बैठकीत निलंबनाशी संबंधित ठराव पारित केला होता. फेडरेशन आणि त्याच्या संलग्न युनिटमधील कोणत्याही बॉक्सिंग क्रियाकल्पांपासून याचिकाकर्ते आणि त्यांना त्यानुसार बाजूला ठेवले गेले होते. शेवटी खंडपीठाने असेही जोडले की, " निर्णय सुनावल्यानंतर, प्रतिवादी फेडरेशनच्या ( BFI ) च्या वकिलांनी आज दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. आदेशात नोंदवलेले निष्कर्ष लक्षात घेऊन त्यांची...