Posts

जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

Image
जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा संपन्न   हस्ती पब्लिक स्कूल क्रीडा संकुल दोंडाईचा येथे झालेल्या धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन, हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त भव्य बॉक्सिंग स्पर्धेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष वैशाली महाजन माजी सभापती पाणीपुरवठा विभाग दोंडाईचा, कार्यक्रमाची उद्घाटक युतिका भामरे वैद्यकीय अधिकारी दोंडाईचा, दीप प्रज्वलन स्मितल गोस्वामी दंत आरोग्य तज्ञ, सकीना भारमल समन्वयक नियंत्रक हस्ती ग्रुप दोडाईचा, प्रमुख पाहुणे जयश्री सोमवंशी आर्किटेक्ट, आशा मन्सुरी ॲडवोकेट, सुरेखा काळे पोलीस कॉन्स्टेबल, हस्ती स्कूल क्रीडा प्रमुख जितेंद्र सुरवाडे, जळगाव शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव निलेश बाविस्कर, हॉकी संघटनेचे सचिव प्रशिक्षक दुर्गेश पवार, तलवारबाजी प्रशिक्षक विशाल पवार, शारीरिक शिक्षण शिक्षक योगेश पाटील, प्रा.भरत कोळी, बॉक्सिंग प्राशिक्षक पवन शिरसाठ, सर्व पंच प्रशिक्षक धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते राष्ट्रीय खेळाडू माहेश्वरी चोपडेचा सन्मान करण्यात आला. व...

धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५

Image
धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५  महिला सशक्तीकरणाचा मंत्र – आत्मविश्वास, ताकद आणि जिद्द! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाला चालना देण्यासाठी धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन आणि हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्च २०२५, रविवार रोजी ही स्पर्धा हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे आणि उपाध्यक्ष कैलास जैन, सहसचिव लिंबाजी प्रताळे, खजिनदार जितेंद्र बोरसे, किशोर पाटील, योगेश पाटील यांनी महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये समाविष्ट: महिला बॉक्सिंगसाठी विशेष प्लॅटफॉर्म निर्माण करणे महिला खेळाडूंच्या कौशल्यांना वाव देणे आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे महिलांमध्ये आत्मवि...

पंच भूमिका प्रामाणिक असावी

Image
 

धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेची बॉक्सिंग खेळाची प्रचार-प्रसार संदर्भात बैठक संपन्न.

Image
 

जय कवळी यांना निलंबन करण्याचा आदेश रद्द.

Image
मुंबई उच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्ती सुश्री रेवती मोहिते डेरे आणि सुश्री नीला केदार गोखले यांच्या खंडपीठाने बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया या बॉक्सिंगच्या भारतीय महासंघाचे प्रमुख संस्थापक आणि माजी सरचिटणीस श्री. जय कवळी यांच्याविरुद्धचा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा आणि त्यांच्या शिस्तपालन समितीने दिलेल्या अहवालावरून केलेल्या निलंबनचा आदेश रद्द केला ! या प्रकरणातील सर्व मुद्दे लक्षात घेता न्यायमूर्तीने असे नमूद केले की ८ जानेवारी २०२२ रोजीच्या विवाद आणि शिस्तपालन आयोगाचे निष्कर्ष आणि शिफारशी रद्द करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही ! " कार्यकारिणीने १० जानेवारी २०२२ च्या बैठकीत निलंबनाशी संबंधित ठराव पारित केला होता. फेडरेशन आणि त्याच्या संलग्न युनिटमधील कोणत्याही बॉक्सिंग क्रियाकल्पांपासून याचिकाकर्ते आणि त्यांना त्यानुसार बाजूला ठेवले गेले होते. शेवटी खंडपीठाने असेही जोडले की, " निर्णय सुनावल्यानंतर, प्रतिवादी फेडरेशनच्या ( BFI ) च्या वकिलांनी आज दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. आदेशात नोंदवलेले निष्कर्ष लक्षात घेऊन त्यांची...

"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी"

Image
"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी" धुळे - ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त समस्त नारी शक्तीला आमच्या क्रीडा परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि याचं अनुषंगाने माझा आजचा लेख नारी शक्तीला समर्पित असेल,खरंतर प्रत्येक दिवस हा नारी शक्तीचा असायला हवा कारण तिच्या सारखं सामर्थ्य हे आज कोणाकडेच नाही,ती प्रत्येक क्षेत्रात पारंगत राहत तिच्या बलाढ्य अशा आत्मविश्वासामुळे त्या-त्या क्षेत्राचा विकास हा प्रगतीपथावर आहे, त्यामुळेच तिला तिच्या जीवनातील सामर्थ्याचे संपूर्ण स्वतंत्र हवं,विशेष म्हणजे ती पुरुषांच्या बरोबरीने आज अनेक क्षेत्रात उतुंग भरारी घेत सक्षम असल्याने "चूल आणि मूल" ही पडद्याआड संस्कृती बाजूला ठेवून तिचा आदर आपल्या समाजाने केला पाहिजे तेव्हाच 'नारी शक्तीचा जागर' खऱ्या अर्थाने होईल,आजही आपला समाज लिंगामुळे तिच्या कार्याला कमी लेखतो आणि हिचं बाब आपल्या समाजाला अधोगतीकडे घेऊन जाते खरंतर घर व समाज यांच्या विकासाच्या बाबतीत पुरुष व स्त्री या दोघांचे समान योगदान असतं तरी पण आपण ती महिला आहे म्हणून तिला पाहिजे तसं स्वतंत्र देऊ शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आपल्...

"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-२)

Image
"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-२) आपण सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी या लेख मालिकेच्या भाग १ मध्ये सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली आणि यावरुनचं आपल्याला असं लक्षात येतं की शालेय स्तरावरील 'सर्वांगीण विकास' हा मुलांच्या शारीरिक व मानसिक व्यक्तिमत्वाला एक यशस्वीतेचा आकार देण्याचे कार्य नियमितपणे करत असतो म्हणून शालेय स्तरावर आकार देणाऱ्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया ही प्रभावी असायला हवी,खरंतर ज्याप्रमाणे सर्वांसाठी शिक्षण हा देशाच्या शिक्षणविषयक इतिहासामध्ये एक महत्वाचा टप्पा आहे,त्याचंप्रमाणे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत 'सर्वांगीण विकास' हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे,सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा एक व्यापक दृष्टीकोन आहे,शिक्षण हे जीवनाभिमुख असून जीवनाची पूर्वतयारी शिक्षण असल्याने शालेय स्तरावरील वयोगट ३ ते ७, ८ ते १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मुलभूत हालचालींचा विकास व कारक कौशल्याचा विकास हा उत्तमरित्या होत असल्यामुळे शारीरिक,मानसिक क्षमतेसह बौद्धिक,भावनिक व सामाजिक आदी मुल्यांचा विकास ...