Posts

"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी"

Image
"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी" धुळे - ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त समस्त नारी शक्तीला आमच्या क्रीडा परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि याचं अनुषंगाने माझा आजचा लेख नारी शक्तीला समर्पित असेल,खरंतर प्रत्येक दिवस हा नारी शक्तीचा असायला हवा कारण तिच्या सारखं सामर्थ्य हे आज कोणाकडेच नाही,ती प्रत्येक क्षेत्रात पारंगत राहत तिच्या बलाढ्य अशा आत्मविश्वासामुळे त्या-त्या क्षेत्राचा विकास हा प्रगतीपथावर आहे, त्यामुळेच तिला तिच्या जीवनातील सामर्थ्याचे संपूर्ण स्वतंत्र हवं,विशेष म्हणजे ती पुरुषांच्या बरोबरीने आज अनेक क्षेत्रात उतुंग भरारी घेत सक्षम असल्याने "चूल आणि मूल" ही पडद्याआड संस्कृती बाजूला ठेवून तिचा आदर आपल्या समाजाने केला पाहिजे तेव्हाच 'नारी शक्तीचा जागर' खऱ्या अर्थाने होईल,आजही आपला समाज लिंगामुळे तिच्या कार्याला कमी लेखतो आणि हिचं बाब आपल्या समाजाला अधोगतीकडे घेऊन जाते खरंतर घर व समाज यांच्या विकासाच्या बाबतीत पुरुष व स्त्री या दोघांचे समान योगदान असतं तरी पण आपण ती महिला आहे म्हणून तिला पाहिजे तसं स्वतंत्र देऊ शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आपल्

"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-२)

Image
"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-२) आपण सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी या लेख मालिकेच्या भाग १ मध्ये सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली आणि यावरुनचं आपल्याला असं लक्षात येतं की शालेय स्तरावरील 'सर्वांगीण विकास' हा मुलांच्या शारीरिक व मानसिक व्यक्तिमत्वाला एक यशस्वीतेचा आकार देण्याचे कार्य नियमितपणे करत असतो म्हणून शालेय स्तरावर आकार देणाऱ्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया ही प्रभावी असायला हवी,खरंतर ज्याप्रमाणे सर्वांसाठी शिक्षण हा देशाच्या शिक्षणविषयक इतिहासामध्ये एक महत्वाचा टप्पा आहे,त्याचंप्रमाणे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत 'सर्वांगीण विकास' हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे,सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा एक व्यापक दृष्टीकोन आहे,शिक्षण हे जीवनाभिमुख असून जीवनाची पूर्वतयारी शिक्षण असल्याने शालेय स्तरावरील वयोगट ३ ते ७, ८ ते १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मुलभूत हालचालींचा विकास व कारक कौशल्याचा विकास हा उत्तमरित्या होत असल्यामुळे शारीरिक,मानसिक क्षमतेसह बौद्धिक,भावनिक व सामाजिक आदी मुल्यांचा विकास

"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-१)

Image
  "सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-१) धुळे - २१ व्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विज्ञान युगात जर आपल्या मुलांना सुदृढ,निरोगी आयुष्यासह व आनंदी जीवनशैलीसह यशस्वी बनवायचं असेल तर त्यांचा 'सर्वांगीण विकास'होणं हे फार गरजेचं आहे आणि तो शारीरीक,मानसिक,बौद्धिक, भावनिक,सामाजिक,आध्यामिक व व्यावसायिक अशा सप्तरंगाच्या घटकांवर अवलंबून आहे,त्यामुळे सर्वांगीण विकासाची प्रभावी अंमलबजावणी सातत्याने होणं हे आजच्या आधुनिक युगासाठी फार महत्वाचं असेल पण ही प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी माध्यम कोणतं असावं..? असा जर प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होत असेल तर अजिबात चिंता करण्याची गरज नाही कारण शालेय प्राथमिक/माध्यमिक स्तरावर राबविण्यात येणारा अभ्यासक्रम हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनेचं असतो त्यात वरील सर्व घटक हे अंतर्भूत असतात, तरी पण सर्वांगीण विकासाच्या बाबतीत ओरड का..? हा ही एक प्रश्न आहेच, मग आपल्याला थोडं राज्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा व नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की विद्यार्थ

‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️

Image
 ‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️ ‼️सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्की वाचा.‼️ "मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पालकांनी सुध्दा प्रयत्न करायला हवा." 📚⚽🚩🖋️🏆🥇 (- भरत कोळी, शारीरिक शिक्षण शिक्षक,धुळे)         "परीक्षेच्या दृष्टीने मुलांना वाचन संस्कृतीकडे नेण्याची नितांत गरज आहे,कारण आजच्या वाढत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे पेपर लिहितांना बऱ्याच अडचणी मुलांना येतात,वाचतांना देखील अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे प्रश्न समजत नाही, खरंतर आजच्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेण्याचा रसच दिसत नाही अशी परिस्थिती शालेय स्तरावर आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून निकालावर येत असतो आणि पालकांची ओरड होते की शिक्षक लक्ष देत नाही, शिकवत नाही,खेळांमुळे मार्क कमी मिळाले,अभ्यासाचे नुकसान झाले अशी काही परिस्थिती बघायला मिळते,खरंतर खेळांचा आणि परीक्षेचा जवळचा संबंध आहे खेळ मुलांचा ताणतणाव दूर करण्यास विशेष भुमिका पार पाडतो, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते मग खेळामुळे कसे काय मार्क कमी पडू शकतात..? हा मला पडलेला प्रश्न आहे.वि

तंत्रज्ञान शाप की वरदान ?

Image
"आजची पिढी अशीच जर अधिकाधिक तंत्रज्ञानावर अवलंबुन असेल तर भविष्यातील शारीरिक व मानसिक आरोग्य हे अतिशय चिंताजनक असेल आणि पर्याय म्हणून चालण्यासाठी, जेवणासाठी, बसण्यासाठी व हसण्यासाठी सुध्दा तंत्राचा अवलंब करावा लागेल." (सुखाच्या मोह मायाने, शारीरिक, मानसिक क्षमतेची केली रे दयाना..) 🥊💪🏻🔖🏏👍🎯🏆🥇💃 भरत कोळी (खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहिल.)

"भारतीय महिला बॉक्सिंग संघ जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत हजारो भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करेल."

Image
"भारतीय महिला बॉक्सिंग संघ जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत हजारो भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करेल." धुळे - नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर १५ मार्च ते २६ मार्च २०२३ दरम्यान आयोजित होणाऱ्या 'जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप -२०२३' चे आयोजन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय क्रीडा मंत्रालय यांच्या अनमोल सहकार्याने आयोजित केली आहे,भारताने यापूर्वी ही जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यशस्वी असं आयोजन केलं होतं,सध्या भारत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या रँकिंगमध्ये ३ स्थानी असल्यामुळे पहिल्या स्थानावर विराजमान होण्यासाठी ही स्पर्धा भारतासाठी अतिशय महत्वाची ठरेल,भारत तिसऱ्यांदा या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करत असल्याने भारतात बॉक्सिंग खेळाचे जाळे हे तळागळापर्यंत अधिक वेगाने विणले जाईल यात शंका नाही, भारतात बॉक्सिंग खेळासाठी दिवसेंदिवस पोषक वातावरण तयार होत असल्याने येत्या काळात भारतीय बॉक्सिंगपटू ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा,जागतिक क्रीडा स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित करतील, दिल्लीत होणाऱ्या जागतिक महिला ब

मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज

Image
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त राजकीयच गोष्टी सांगितल्या जातात... औरंगजेबाशी युद्ध, अफजलखानाचा कोथळा, शाहीस्तेखानाची बोटे, आग्र्याहून सुटका इ इ. पण मला भावलेले छत्रपती शिवाजी अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतात : १. आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी हे खरे "सामाजिक क्रांतीकारक" होते ! २. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये, हा आदेश देणारे "लोकपालक राजे"  होते ! ३. हातात तलवारीबरोबर पट्टी घेऊन जमीन मोजून नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक"  होते ! ४. विना कारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक"  होते ! ५. समुद्रप्रवास करण्यास हिंदूधर्मात बंदी होती, तो विरोध पत्करून आरमार उभे केले. धर्मापेक्षा देशहीत मोठे हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक"  होते ! ६. अमावस्येच्या रात्री लढाया करून त्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे सुधारक"  होते हे नक्की ! त्यांनी ३५० वर्षांपूर्वी सुरु केलेली पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प